Home ब्रेकिंग न्यूज Central Railway Mega Block : 8 नोव्हेंबरला लोकल प्रवाशांचे हाल होणार; माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी मार्गावर गाड्या रद्द, वेळापत्रक कोलमडणार

Central Railway Mega Block : 8 नोव्हेंबरला लोकल प्रवाशांचे हाल होणार; माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी मार्गावर गाड्या रद्द, वेळापत्रक कोलमडणार

0
Central Railway Mega Block : 8 नोव्हेंबरला लोकल प्रवाशांचे हाल होणार; माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी मार्गावर गाड्या रद्द, वेळापत्रक कोलमडणार
(फोटो सौजन्य: प्रहार न्यूज)

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रूळांची दुरुस्ती आणि विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, दिनांक 08 नोव्हेंबर 2026 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मेन लाईन आणि हार्बर लाईनवरील रेल्वे विस्कळीत होणार असून, प्रवाशांना मोठ्या मनस्तापचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नाहक त्रास होऊ नये म्हणून वेळापत्रकाची सविस्तर माहिती दिली आहे.

मेन लाईनवरील ब्लॉक आणि परिणाम

माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाउन’ धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल.

  • डाउन धिम्या मार्गावरील गाड्या: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 10.14 ते दुपारी 03.32 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. त्यानंतर पुन्हा धिम्या मार्गावर आणल्या जातील आणि गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • अप धिम्या मार्गावरील गाड्या: ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 03.51 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या लोकल मुलुंड स्थानकावर जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुन्हा धिम्या मार्गावर जातील आणि 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • तसेच CSMT वरून सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या सर्व लोकल सेवा 15 मिनिटे उशिरा धावतील.

https://www.prahaar.in/2026/11/05/third-party-audits-of-construction-sites-to-be-conducted-by-the-municipal-corporation/

हार्बर व ट्रान्स-हार्बर लाईनवरील ब्लॉक

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईनवर (पोर्ट लाईन वगळता) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक राहील.

  • हार्बर लाईन रद्द सेवा: पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत CSMT कडे जाणाऱ्या अप सेवा आणि CSMT वरून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन सेवा पूर्णपणे रद्द राहतील.

  • ट्रान्स-हार्बर लाईन रद्द सेवा: पनवेलवरून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप सेवा आणि ठाण्यावरून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन सेवा बंद राहतील.

पर्यायी व्यवस्था

ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. तसेच ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा सुरू राहतील आणि पोर्ट लाईन सेवा देखील सुरळीत सुरू राहणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि त्यानुसार प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here