Home ताज्या घडामोडी Salman Khan new song released: ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सलमान खानच्या आवाजाची जादू; ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे प्रदर्शित!

Salman Khan new song released: ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सलमान खानच्या आवाजाची जादू; ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे प्रदर्शित!

0
Salman Khan new song released: ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सलमान खानच्या आवाजाची जादू; ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे प्रदर्शित!

Salman Khan new song released: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्या जोडीचे ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ (Teri Sexy Beauty) हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ (Maatrubhumi: May War Rest In Peace) या चित्रपटातील हे गाणे आहे. भाईजानचा आवाज आणि चित्रांगदा यांचा ग्लॅमरस अंदाज यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळत असून, दोघांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

या नव्या जोडीच्या रूपात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह या गाण्यात एकत्र दिसत आहेत. या दोघांमधील केमिस्ट्री हे गाण्याचे प्रमुख आकर्षण ठरत असून, गाण्यात चित्रांगदा अत्यंत आकर्षक दिसतआहे. सलमान यांचा सहजसुंदर अंदाज आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स कमालीचा आहे. या जोडीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढते. दोघांमधील खास बॉन्डिंगमुळे हे नवे गाणे चाहत्यांसाठी अधिकच मनोरंजक ठरत आहे. या गाण्याची खासियत म्हणजे खुद्द सलमान खान हे गाणे गात असून, चाहत्यांना तब्बल ११ वर्षांनंतर भाईजानच्या आवाजातील गाण्याचा आनंद घेता येत आहे. हे गाणे त्याने गायिका मुस्कानसोबत गायले आहे. सलमान खानने बुधवारी (४ नोव्हेंबर २०२६) पहाटे ५:१२ वाजता सोशल मीडियावर एक मजेशीर कॅप्शन लिहीत या गाण्याची घोषणा केली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “रवाना होण्याची वेळ पहाटे ५:१२… फ्लाइट वेळेवर आहे, २ पेग मारून मी माझ्या सेक्सी ब्यूटीसोबत उड्डाण करत आहे… माहिती नाही मी कुठे लँड करेन.”

https://www.prahaar.in/2026/11/04/government-of-maharashtra-special-drive-for-tribal-communities-to-facilitate-the-issuance-of-aadhaar-cards-and-birth-certificates/

‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा एक गंभीर युद्धपट (War Drama) वाटत असला, तरी या गाण्यात भरपूर रोमान्स, मस्ती, धमाल आणि खोडकरपणा पाहायला मिळत आहे. गाण्यात चित्रांगदा सिंहचा अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत असून, लाल साडीतील तिच्या रूपाने आणि सलमानसोबतच्या भन्नाट केमिस्ट्रीने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याचे संगीत साजिद खान यांनी केले असून, गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. सदर गाण्याचे नृत्यदिग्दर्शन (Choreography) प्रसिद्ध कोरिओग्राफर सीझर गोन्साल्विस (Caesar Gonsalves) यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. सैनिकांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट त्याचा फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here