भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि अर्शदीप सिंगची खेळी महत्त्वाची ठरली. पण सामनावीराचा पुरस्कार अंशुल कंबोजला मिळाला. (Photo: ANI)विराट कोहलीने 51 चेंडूत 74 धावांची खेळी, तर अर्शदीप सिंगने 4 विकेट घेतल्या. पण या सामन्यात दोन विकेट घेणाऱ्या अंशुल कंबोजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दोन विकेटसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. (Photo: BCCI Twitter)अंशुल कंबोजला सामनावीराचा पुरस्कार मिळण्याचं कारण म्हणजे किफायतशीर गोलंदाजी… अंशुल कंबोजने 10 षटकात 22 धावा देत 2 विकेट काढल्या. इतकंच काय तर त्याने 46 चेंडूत एकही धाव दिली नाही. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. (Photo: BCCI Twitter)अंशुल कंबोजने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण पहिल्याच सामन्यात 82 धावा दिल्या होत्या. त्याला आणखी एक संधी देण्यात आली आणि त्याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला. (Photo: ANI)अंशुल कंबोज हा फक्त दोन बळी घेऊन सामनावीर म्हणून गौरवण्यात आलेला सातवा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराहलाही दोन बळी घेतल्याबद्दल दोनदा सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (Photo: ANI)