CRPF Historic Record : केंद्रीय राखीव पोलीस दलाने म्हणजेच (सीआरपीएफने) आपल्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मागील १२ महिन्यांपासून सीआरपीएफच्या दलात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दलातील शेवटची अशी घटना ३० ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती. देशभरातील विविध संवेदनशील ठिकाणी CRPF चे जवान तैनात असूनही, या दलाने कोणतीही जीवितहानी न होता सलग १२ महिने पूर्ण केले आहेत. आतापर्यंत १९४७ ते २०२६ पर्यंतच्या ७९ वर्षांच्या कालावधीत विविध मोहिमांमध्ये (Operations) केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) २,२७० जवान आणि अधिकारी शहीद झाले आहेत. सुमारे ४७ वर्षांनंतर सीआरपीएफच्या इतिहासात हा विक्रम साधला गेला आहे. यासंदर्भात सोमवारी सीआरपीएफचे महासंचालक (डीजी) जी. पी. सिंग यांनी ही घोषणा केली.
ज्ञानेंद्र प्रताप सिंह सीआरपीएफचे महासंचालक यांनी त्यांच्या ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्ट केली आहे. ज्यात ‘सीआरपीएफच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा – दलात सलग एक वर्ष कोणतीही कारवाईदरम्यान जीवितहानी झालेली नाही. दलातील शेवटची कारवाई दरम्यानची जीवितहानी ३० ऑक्टोबर, २०२५ रोजी झाली होती. असे ४७ वर्षांनंतर घडले आहे; यापूर्वी असा काळ जानेवारी १९७९ मध्ये होता,’ असे म्हंटले आहे. (CRPF Historic Record )
https://www.prahaar.in/2026/11/03/tiger-shroff-news-mumbai-crime-branch-arrests-22-year-old-woman-in-tiger-shroff-shooting-case-number-of-accused-increases/
दरम्यान, या ऐतिहासिक यशात आधुनिक शस्त्रे आणि नवीन उपकरणांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सैनिकांना दिलेले प्रगत प्रशिक्षण आणि जमिनीवर विकसित केलेली अचूक रणनीती ही अत्यंत प्रभावी ठरली, त्याचा फायदा जवानांना झाला. कोणत्याही चकमकीनंतर जखमी सैनिकांना तात्काळ प्रमुख रुग्णालयांमध्ये पोहोचवण्याच्या प्रणालीमुळे मोठा फरक पडला आहे.
A significant milestone in the history of CRPF – 12 consecutive months (One Year) have passed without any Operational fatality in the force, the last operational fatality in the force being on Oct 30th 2025. This has happened after 47 Years (last such period ended in January 1979).
Provision of latest & contemporary hardware, better training & strategic planning along with focus on post incident response including high speed evacuation of injured personnel to secondary and tertiary medical facilities has contributed immensely in achieving this milestone. It’s specially significant since this has happened while we continue to be deployed and engage intensely in all the major operational theatres achieving significant breakthrough results.
We remain committed to keep the country peaceful & safe for all its citizens.
@crpfindia— GP Singh (@gpsinghips) November 1, 2026
सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह X पोस्ट
सीआरपीएफच्या (CRPF) इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा – दलामध्ये सलग १२ महिने (एक वर्ष) कोणत्याही प्रकारची ‘ऑपरेशनल जीवितहानी’ (operational fatality) झालेली नाही. दलातील शेवटची अशी घटना ३० ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती. ४७ वर्षांनंतर प्रथमच असा काळ आला आहे (यापूर्वी असा कालावधी जानेवारी १९७९ मध्ये संपला होता).
अत्याधुनिक उपकरणे, उत्तम प्रशिक्षण आणि धोरणात्मक नियोजनासोबतच, एखादी घटना घडल्यानंतर तातडीने प्रतिसाद देणे. ज्यामध्ये जखमी जवानांना त्वरित उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधांपर्यंत (secondary and tertiary medical facilities) पोहोचवण्याची व्यवस्था समाविष्ट आहे. या सर्व गोष्टींमुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. हे विशेष उल्लेखनीय आहे, कारण आजही आमचे जवान सर्व प्रमुख कार्यक्षेत्रांमध्ये (operational theatres) तैनात असून तिथे सक्रियपणे कार्यरत आहेत आणि महत्त्वपूर्ण यश मिळवत आहेत. देशातील सर्व नागरिकांसाठी शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.