Home क्रीडा Glenn Maxwell: ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट

Glenn Maxwell: ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट

0
Glenn Maxwell: ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट
ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा फोटो सौजन्य: X Account

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल 14 वर्षे ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मॅक्सवेलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. आक्रमक फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उपयुक्त गोलंदाजी यामुळे क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या खेळाडूच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा शेवट झाला आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये ओमानविरुद्ध खेळला होता.

https://www.prahaar.in/2026/11/03/india-a-vs-new-zealand-a-yashasvi-jaiswal-yash-rathod-unbeaten-century-draw-second-unofficial-test/

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना मॅक्सवेलने ‘द फायनल वर्ड’ या पॉडकास्टवर मनातील भावना व्यक्त केल्या. हा निर्णय घेणे काहीसे दुःखद असले तरी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले. टी-20 विश्वचषकापूर्वी आणि स्पर्धेनंतर निवड समितीसोबत अनेकदा चर्चा झाली होती. या चर्चा अतिशय मोकळेपणाने आणि स्पष्टपणे झाल्याचेही त्याने सांगितले.

आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 2009 च्या आसपास पहिल्यांदा व्हिक्टोरियाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला, तेव्हा भविष्यात एवढी मोठी कारकीर्द घडेल असे वाटले नव्हते, असेही त्याने सांगितले.

https://www.prahaar.in/2026/11/03/ind-vs-nz-what-will-team-indias-playing-xi-be-for-the-first-odi-gill-reveals-details/

ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आकडेवारीच्या दृष्टीनेही प्रभावी राहिली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 149 एकदिवसीय, 130 टी- 20 आंतरराष्ट्रीय आणि 7 कसोटी सामने खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 3990 धावा केल्या, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2897 धावा आणि 154.4 चा स्ट्राइक रेट नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 339 धावा आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण 10 शतके आणि 136 बळींची नोंद केली.

मॅक्सवेलच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धची ऐतिहासिक खेळी. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत असताना दुखापतीवर मात करत मॅक्सवेलने नाबाद 201 धावांची खेळी केली होती. त्याच्या या द्विशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अशक्य वाटणारा विजय मिळवला. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळींपैकी ही एक मानली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here