Home ब्रेकिंग न्यूज Diwali special buses : दिवाळीसाठी पुणे एसटी विभाग सज्ज! 900 जादा बस धावणार; आतापर्यंत 300 बसचे आरक्षण पूर्ण

Diwali special buses : दिवाळीसाठी पुणे एसटी विभाग सज्ज! 900 जादा बस धावणार; आतापर्यंत 300 बसचे आरक्षण पूर्ण

0
Diwali special buses : दिवाळीसाठी पुणे एसटी विभाग सज्ज! 900 जादा बस धावणार; आतापर्यंत 300 बसचे आरक्षण पूर्ण
दिवाळीसाठी पुणे एसटी विभाग सज्ज! 900 जादा बस धावणार; आतापर्यंत 300 बसचे आरक्षण पूर्ण (Google photo)

 Diwali special buses : दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित 300 बससह 900 जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे 300 जादा बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. काही बसचे आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक झाले असून, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद अधिक असल्याचे दिसत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/a-major-social-initiative-by-nita-ambani-anant-ashray-to-be-built-across-100-acres-in-karjat-will-provide-shelter-to-over-5000-people/

स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरीतून जादा बस

नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त राज्याच्या विविध भागांतील नागरिक पुणे आणि परिसरात वास्तव्यास आहेत. दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावी जातात. त्यामुळे सणाच्या काळात बसस्थानकांवर मोठी गर्दी होते.

ही गर्दी लक्षात घेऊन एसटी विभागाने 900 जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बस स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथून सोडण्यात येणार आहेत. नियोजनानुसार, शिवाजीनगर येथून 136, स्वारगेट येथून 235, तर पिंपरी-चिंचवड येथून 455 जादा बस धावणार आहेत.

वल्लभनगर आगारातूनही जादा बस

पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातूनही जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांकडून आगाऊ आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासाचे नियोजन आधीच निश्चित असलेल्या नागरिकांकडून आरक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ऐनवेळी तिकीट काढण्यासाठी होणारी धावपळ टाळता येणार आहे. जागा उपलब्ध असल्यास ऐनवेळीही प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करता येईल.

महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत

एसटी महामंडळाकडून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या सवलतींमुळेही एसटी प्रवासाला पसंती मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या बसस्थानकांवर विभागली जावी, यासाठी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी शक्यतो आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे. उपलब्ध जागांनुसार ऐनवेळीही प्रवासाची सुविधा मिळू शकेल, असे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here