Home देश Honey Singh: हनी सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर, भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू

Honey Singh: हनी सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर, भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू

0
Honey Singh: हनी सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर, भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू
हनी सिंगच्या भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू फोटो सौजन्य: हनी सिंग इन्स्टाग्राम

पंजाब: प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका रस्ते अपघातामध्ये, गायकाच्या भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यासह आणखी एका तरूणाचाही समावेश आहे. आज (रविवार- 1 नोव्हेंबर) पंजाबमधील जालंधर शहरामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातामध्ये विदित ओलकचा मृत्यू झाला आहे. काही तासांपूर्वी हनी सिंगने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी शेअर केलेली आहे. हनी सिंहने ही दु:खद बातमी शेअर करताच चाहत्यांकडून गायकाच्या भाच्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/01/lalit-prabhakars-simple-yet-dashing-look-in-a-white-shirt-goes-viral-fans-cant-take-their-eyes-off-him/

सिंगर हनी सिंगच्या भाच्याच्या निधनाचे वृत्त कळताच कुटुंबीयांवर आणि पंजाबी संगीत क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे (Punjabi Industry). “हे दशक माझ्यासाठी दु:खदायक ठरले आहेत. मी माझा भाचा गमावला आहे. अत्यंत वेदनादायक घटना आहे. भोलेनाथ कृपा कर…” अशा शब्दात हनी सिंगने आपल्या भावना इन्स्टा स्टोरीवर व्यक्त केलेल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनी सिंगचा भाचा विदित लोक याच्या कारचा जालंधर शहरामध्ये रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यावेळी कारमध्ये विदितसोबत आरव तलवार नावाचा त्याचा एक मित्र सुद्धा होता. विदित आणि आरव एका मित्राच्या बर्थडे पार्टीवरून घरी परतत होते.

फोटो सौजन्य: हनी सिंग इन्स्टाग्राम

मित्राच्या बर्थडे पार्टीवरून घरी परतत असतानाच त्यांच्या भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या महानगर पालिकेच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. हा भीषण कार अपघात, पोलीस लाईन्स परिसरातील उड्डाणपुलावर झाला.कारची धडक इतकी जोरदार होती की, त्या धडकेमध्ये विदित आणि आरव या दोघांचाही भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. बारादरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री 3 वाजता, या कार अपघाताची माहिती आम्हाला कळाली. पोलीस लाईन्स परिसरामध्ये असलेल्या उड्डाणपुलावर महानगर पालिकेचे सफाई कर्मचारी स्वच्छता करत होते. त्यावेळी सफाई कामगारांनी कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर- ट्रॉली रस्त्यावर उभी केली होती. बीएमसी चौकातून बीएसएफ चौकाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टर- ट्रॉलीला धडक दिली. या धडकेमध्येच दोघांचाही मृत्यू झाला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/01/two-brothers-an-unbreakable-bond-emotional-trailer-for-bandhu-released-release-date-also-set/

कार अपघातापूर्वी कारमध्ये एकूण पाच जण होते. त्यापैकी तिघे जण घरी पोहोचले होते. विदित आणि आरव घरी जात असतानाच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. पण दोघांच्याही कुटुंबीयांनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले. विदित ओलक हा हनी सिंगचा भाचा असून त्याचे वडील दिनेश ओलक हे पंजाबी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध ‘स्पीड रेकॉर्ड्स’ कंपनीचे मालक आहेत. तर अपघातात मृत्युमुखी पडलेला आरव तलवार हा ‘पॅपी स्वीट्स’च्या मालकाचा मुलगा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here