Home ब्रेकिंग न्यूज मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

0
मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी सेन्सर आधारीत प्रदुषक निर्देशक बसवण्यात आले आहेत. या प्रदुषक निर्देशकांमधील आकडेवारीमध्ये बऱ्याच तफावत आढळून येते. यातील आकडेवारी खोटी दर्शवली जाते. मानवी हस्तक्षेपामुळे प्रदुषणाची अचुक माहिती आणि मोजमाप होत नाही. त्यामुळे याबाबतचे आरोप होत असतानाच आता महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने या सेन्सर आधारीत प्रदुषक निर्देशकाच्या डिजिटल फलकांची आता त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडीट केले जाणार आहे. मुंबईत असे 3,000 सेन्सर बोर्ड बसवले असून यासाठी महापालिकेच्यावतीने महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि या संस्थेची निवड केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील सर्व बांधकाम स्थळांवर सेन्सर-आधारित हवेच्या गुणवत्तेची मोजमाप उपकरणे अर्थात प्रदूषण निर्देशक लावण्याचे आणि त्यांना केंद्रीय मॉनिटरिंग सिस्टीमशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत सध्या 2,500 ते 3,000 बांधकामे सुरु असून यासर्व ठिकाणे सेन्सर आधारीत डिजिटल फलक बसवण्यात आले आहेत. यावर हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दर्शवला जातो आणि त्यामाध्यमातून प्रकल्पाच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा अंदाज बांधणे सोपे जाते. या सेन्सर आधारीत फलकांमुळे महापालिकेला संबंधित बांधकामांना नोटीस बजावून प्रदुषण नियंत्रणाच्या दृष्टीकोनातून जारी करण्यात आलेल्या 28 मार्गदर्शक तत्वांमधील सुचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात येतात. परंतु हे डिजिटल फलक कार्यान्वित आहेत का? त्यातील आकडेवार योग्य आहे का? कि त्यात मानवी हस्तक्षेप करत खोटी माहिती दर्शवली जाते हे तपासण्यासाठी महापालिकेच्या वतीने त्रयस्थ संस्थेमार्फत अर्थात थर्ड पार्टी ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवून यातील तज्ज्ञ संस्थेची निवड केली आहे. यासाठी महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि यांची निवड पुढील 3 वर्षांसाठी करण्यात आली असून या तीन वर्षांसाठी 11.28 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/01/mumbai-municipal-corporation-to-install-new-fire-safety-system-across-seven-buildings-at-nair-hospital-amid-safety-concerns/

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार मुंबई महानगरपालिका सीमेंतर्गत सर्व बांधकाम स्थळांवर सेन्सर आधारित हवेच्या गुणवत्तेचे मॉनिटर आणि एलईडी डिस्प्ले बसवणे बंधनकारक केले आहे. जे मुंबई महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या तांत्रिक तपशीलांशी सुसंगत असावे आणि केंद्रीय डॅशबोर्डशी जोडलेले असावे अशी अट आहे. सद्यस्थितीत मुंबईतील बांधकाम स्थळांवरील सेन्सर आधारित हवेच्या गुणवत्तेच्या मॉनिटर्सची स्थापना आणि त्यात प्रगती झालेली असली तरी, मुंबईतील बांधकाम स्थळांवरील सेन्सर आधारित हवेच्या गुणवत्तेच्या मॉनिटर्सची कामगिरी तपासण्यासाठी स्वतंत्र त्रयस्थ संस्थेकडून तपासणी (थर्ड पार्टी ऑडीट) करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार या एलईडी फलकांची तपासणी करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडीट करण्यासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारे एलईडी फलकांचे ऑडीट केल्याने बांधकामांमुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here