मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट एक्स्प्रेसचे रूपांतर आता मेल- एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 सुपरफास्ट एक्स्प्रेस ह्या डाऊन आणि अप दोन्हीही बाजूंनी अशा एकूण 18 एक्स्प्रेसला आता मेल- एक्स्प्रेसमध्ये रूपांतर केले आहे. शिवाय, मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने सुधारित गाडी क्रमांकासह नॉन- सुपरफास्ट गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने यादी जाहीर करत कोणकोणत्या सुपरफास्ट एक्स्प्रेसला मेल- एक्स्प्रेस म्हणून चालवणार आहे, याची यादी जाहीर केली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/31/5-lakh-rupees-compensation-for-kin-in-cases-of-custodial-death-new-state-government-policy-comes-into-effect/
मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने निवडक गाड्या दिनांक 1 जानेवारी 2027 पासून सुधारित गाडी क्रमांकांसह नॉन- सुपरफास्ट गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून प्रवाशांना विनंती केली की, त्यांनी बदललेले गाडी क्रमांक लक्षात घ्यावेत आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. यामध्ये, मुंबई सीएसएमटी- हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई सीएसएमटी- पुणे प्रगती एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरूवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- करमळी वातानुकूलित एक्स्प्रेस, मुंबई सीएसएमटी- बनारस महानगरी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या कँट तुलसी एक्स्प्रेस, मुंबई सीएसएमटी- चेन्नई एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- बनारस एक्स्प्रेस आणि पुणे- काजीपेठ एक्स्प्रेस अशा 9 एक्स्प्रेसचा समावेश आहे.
प्रवाशांनो सविस्तर माहितीसाठी रेल्वेने शेअर केलेली पोस्ट पाहावी…
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
मध्य रेल्वेच्या निवडक गाड्या दिनांक १ जानेवारी २०२७ पासून सुधारित गाडी क्रमांकांसह नॉन-सुपरफास्ट गाड्या म्हणून चालवण्यात येणार आहेत.
प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी बदललेले गाडी क्रमांक लक्षात घ्यावेत आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
#CentralRailway #PassengerUpdate #TrainUpdate #IndianRailways
— Central Railway (@Central_Railway) October 30, 2026
या 9 एक्स्प्रेसच्या दोन्हीही दिशांच्या सेवेमध्ये हा बदल लागू होणार आहे. सुपरफास्ट ट्रेनच्या तिकिटावर मूळ भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क आकारले जाते. सुपरफास्ट दर्जा रद्द झाल्यानंतर हे शुल्क आकारले जाणार नसल्याने प्रवाशांच्या तिकीटदरात कपात होण्याची शक्यता आहे. ह्या सर्व एक्स्प्रेसच्या प्रत्यक्ष भाड्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. अद्याप रेल्वेकडून ह्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. येत्या 1 जानेवारीपासून प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना, आरक्षणाची स्थिती आणि ट्रेनच्या सुधारित क्रमांकाची खात्री करूनच आपल्या तिकिटाची बुकिंग करावी. नवीन क्रमांकांची अधिकृत माहिती मध्य रेल्वेकडून जाहीर झाल्यानंतरच प्रवाशांनी अद्ययावत तपशीलानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन सुद्धा मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/31/rain-makes-an-appearance-in-mumbai-for-the-second-consecutive-day-temperatures-rise-and-air-quality-deteriorates-in-some-areas/