Home ताज्या घडामोडी लडाखमध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना ‘एकता दिवस’ची दिली शपथ

लडाखमध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना ‘एकता दिवस’ची दिली शपथ

0
लडाखमध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना ‘एकता दिवस’ची दिली शपथ
लेह, लदाख मध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यात आला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश सचिवालयात मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी तिथल्या नागरिकांना शपथ दिली. यावेळी तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. देशप्रेमाच्या वातावरणात उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा मजबूत संदेश देण्यात आला. (Photo: Prahaar)
‘भारताचे लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त, केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’निमित्त तिथल्या नागरिकांनी भरघोस प्रतिसाद मिळाला. (Photo: Prahaar)
कार्यक्रमामध्ये, लडाख केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी लेह येथील केंद्रशासित प्रदेश सचिवालयात उपस्थितांना ‘एकता दिवस’ची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात प्रशासकीय सचिव, इतर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. (Photo: Prahaar)
केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या निर्देशानुसार, लडाखमधील विविध जिल्ह्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये अशाच प्रकारे शपथविधी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. (Photo: Prahaar)
देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकता व एकजुटीची भावना अधिक दृढ करण्यासाठी दरवर्षी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो. (Photo: Prahaar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here