मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील झोपडपट्टी परिसर, अरुंद गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे तसेच कचरापेट्यांच्या परिसरात साचलेला कचरा जलदगतीने उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात आता महापालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या परिसरातील कचरा उचलण्यासंदर्भात कचरा ई-वाहने अर्थात ई-ऑटो रिक्षाची सुविधा आता भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांत मोठा आणि दाटीवाटीने असलेल्या कुर्ला एल विभागामध्ये सध्या सहा ई कचरा वाहने भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. ( Kurla Cleanliness Drive)
https://www.prahaar.in/2026/10/30/new-delhi-to-varanasi-vande-bharat-sleeper-express-launch-train-timings-and-click-here-for-more-information/
मुंबईतील कुर्ला एल विभागातील अरुंद गल्लीमधील कचरा गोळा कचरा गोळा करण्यासाठी तसेच वाहून नेण्यासाठी ई-वाहने अर्थात ई-ऑटो रिक्षा सेवाभाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. मुंबईतील कचरा कुंड्यांच्या ठिकाणी बाहेर कचरा मोठ्याप्रमाणात टाकला जात असून यामध्ये मुंबईत अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून विशेषत: झोपडपट्टी परिसरातील अरुंद गल्लीमध्ये साचणारा कचरा यामुळे दुर्गंधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छता राखणे हे आवश्यक असल्याने जनतेच्रूा आरोग्याचा विचार करता तसेच पर्यावरणाचा धोका कमी करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रभावीपणे कचरा उचलण्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक असल्याने एल विभागामध्ये सहा ई ऑटो रिक्षा सेवा भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मे. एस. के. ग्रुप ऑफ़ कंपनीजची निवड करण्यात आली आहे. यासाठी भाडेतत्वावर ही वाहनांची सुविधा घेण्यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या भाडेतत्वावरील ई ऑटो रिक्षा सुविधांमुळे झोपडपट्टी परिसर आणि दाटीवाटीमध्ये वसलेल्या वसाहतींमधील अरुंद गल्ल्या तसेच सार्वजनिक ठिकाणे तसेच कचरापेट्यांच्या परिसरात साचलेला कचरा जलदगतीने उचलून त्याची विल्हेवाट लावता येईल असेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.