Home ताज्या घडामोडी दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

0
दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित
दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने चारा खरेदीचे दर निश्चित केले आहेत. पशुधनासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सुक्या चाऱ्याची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो 12 रुपये, तर मुरघासाची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो 8 रुपये निश्चित केली असल्याची माहिती पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

https://www.prahaar.in/2026/10/30/pm-narendra-modi-distributes-the-24th-installment-of-pm-kisan-samman-nidhi-brings-relief-to-lakhs-of-farmers-in-maharashtra/

दुष्काळाच्या काळात सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाराटंचाई आहे. ही चाराटंचाई लक्षात घेता, चाराटंचाईच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाय योजनांना यामुळे मदत होणार आहे. राज्यातील खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेऊन आतापर्यंत एकूण 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी महसूल मंत्र्‍यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने अभ्यास गटाची स्थापना केली होती. या अभ्यासगटात पंकजा मुंडे सदस्य असून या अभ्यास गटाने राज्यासह इतर राज्यांमधील चारा व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा अभ्यास करून उपलब्ध चारा, संभाव्य उत्पादन आणि आगामी काळातील गरज लक्षात घेऊन अहवाल सादर केला. या अहवालाला 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/30/jalgaon-accident-news-horrific-accident-on-the-jalgaon-bhusawal-highway-driver-killed/

मदत- पुनर्वसन विभागाने जाहीर केलेले हे सध्याचे दर दुष्काळाच्या कालावधीसाठीच लागू राहणार आहेत. जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन कार्यकारी समितीने अभ्यासगटाच्या अहवालातील तरतुदी आणि मदत- पुनर्वसन विभागाच्या निर्देशांनुसार चारा खरेदीची कार्यवाही करण्यात येणार आहे. शिवाय, वाहतुकीसाठी परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी निश्चित केलेले दर लागू राहतील. चाऱ्याच्या गुणवत्तेबाबतही शासनाने निकष निश्चित केले आहेत. खरेदी करण्यात येणाऱ्या सुक्या चाऱ्यातील ओलावा कमाल 15 टक्के असावा. चाऱ्याचा दर्जा व्यवस्थित असावा, आंबट किंवा कुबट वास, बुरशी, कीड आणि माती असलेला नसावा. ज्वारी आणि बाजरीच्या चाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. मुरघास हवाबंद आणि बुरशीमुक्त असणे आवश्यक आहे. त्यामधील ओलावा 62 ते 70 टक्के, पीएच 3.5 ते 4.4 आणि क्रूड प्रोटीन किमान 7 टक्के असावे. अन्य घटकांसाठी भारतीय मानक ब्युरोच्या आयएस 19562 : 2026 मधील निकष लागू राहतील.

https://www.prahaar.in/2026/10/30/preparations-for-religious-rituals-supported-by-police-security-are-nearing-completion-the-auspicious-symbols-on-the-religious-flag-are-set-to-be-a-key-attraction/

पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांसमोर शेतीबरोबरच पशु धनाच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होतो. पशुधन हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असल्याने दुष्काळाच्या काळात त्यांना चारा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. याच उद्देशाने सुका चारा आणि मुरघासासाठी आधारभूत दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ चाऱ्याचे दर निश्चित करणे एवढाच या निर्णयाचा उद्देश नसून, पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळावा, यासाठी गुणवत्तेचे निकषही ठरविण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी करून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here