Home महत्वाची बातमी Pollution control measures: प्रदुषणाची भीती, टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याच्या मुद्दयावर प्रशासन ठाम

Pollution control measures: प्रदुषणाची भीती, टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याच्या मुद्दयावर प्रशासन ठाम

0
Pollution control measures: प्रदुषणाची भीती, टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याच्या मुद्दयावर प्रशासन ठाम
(Photo: AI)

मुंबई: मुंबईत वायू आणि धुळीच्या प्रदुषणाची भीती आता मोठ्याप्रमाणात पसरली असून त्यामुळे पुन्हा एकदा टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याच्या विचार केला जात आहे. त्यामुळे धुळीचे प्रदुषण कमी करण्यासाठी टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्यावर प्रशासन ठाम असून लवकरच यापूर्वी फेटाळण्यात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्यास परवानगी देते की धुळ शोषून घेणाऱ्या यांत्रिक झाडुचा वापर करण्यावर स्थायी समिती ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.(POLLUTION)

https://www.prahaar.in/2026/10/30/a-dedicated-gallery-for-the-art-of-cartoonists-will-be-established-in-mumbai-chief-minister-devendra-fadnavis-gives-assurance/

मुंबईतील वायू व धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवणे तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे यामध्ये समतोल साधण्याच्या उद्देशाने, मुंबईतील वाढते वायू व धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकर १५० दिवसांसाठी (पावसाळा वगळून) भाडेतत्त्वावर सात परिमंडळांसाठी सेवा घेवून त्यावर सुमारे आठ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी पाणी कपात लागू असताना लोकभावना लक्षात घेता हा प्रस्ताव दप्तरी दाखल(रेकॉर्ड) करण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली. या उपसूचनेला सर्वांनीच पाठिंबा दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता.(DUST CONTROL AND ADMINISTRATION)

https://www.prahaar.in/2026/10/29/mumbai-municipal-corporation-launches-unique-initiative-using-ai-cameras-to-detect-and-warn-litterers-in-real-time/

मात्र, हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला असला तरी महापालिका सभागृहात वाढत्या प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त करत उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. तसेच प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळीचे प्रदुषण कमी करण्यासाठी रस्ते टँकरच्या पाण्याने धुण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील वर्षीपासून याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याचा प्रयत्न हा न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रदुषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग असल्याने स्थायी समितीने दप्तरी दाखल केलेला प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. स्थायी समितीने नाकारलेला हा प्रस्ताव पुन्हा समितीला सादर करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने लवकरच येणाऱ्या समितीपुढे टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.(ENVIRONMAENT)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here