भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी20 सामना ऑकलँडच्या ईडन पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 30 ऑक्टोबरला होणार आहे. (Photo: ANI)ऑकलँडच्या ईडन पार्कवर भारताची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आतापर्यंत भारताने या मैदानात तीन टी20 सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: ANI)भारताने विजय मिळवलेल्या तीन पैकी दोन सामन्यात श्रेयस अय्यरची भूमिका महत्त्वाची होती. त्याने विजयात मोलाचं सहकार्य केलं. कर्णधार म्हणून या दौऱ्यातील पहिल्या सामन्यातही त्याचं योगदान महत्त्वाचं होतं. (Photo: ANI)भारताने 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर असताना ऑकलँडमध्ये दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवला. अय्यरने पहिल्या सामन्यात नाबाद 58 आमि दुसऱ्या सामन्यात 44 धावांची खेळी केली होती. 58 धावांच्या योगदानासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. (Photo: ANI)श्रेयस अय्यरने ऑकलंडच्या ईडन पार्कवर दोन टी20 सामने खेळले आहेत. या दोन सामन्यात श्रेयस अय्यरने 102 धावा केल्या आहे. याच मैदानात केएल राहुलने 113 धावा करून सर्वाधिक धावा केल्या आहे. आता त्याला मागे टाकण्याची संधी श्रेयसकडे आहे. (Photo: ANI)