Home फोटो गॅलरी Instagram वर आता 90 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड करता येणार, YouTube ला टक्कर देण्यासाठी Meta ची तयारी

Instagram वर आता 90 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड करता येणार, YouTube ला टक्कर देण्यासाठी Meta ची तयारी

0
Instagram वर आता 90 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड करता येणार, YouTube ला टक्कर देण्यासाठी Meta ची तयारी
इन्स्टाग्राम (Instagram) वापरणाऱ्या क्रिएटर्स आणि युजर्ससाठी मोठी अपडेट समोर आली आहे. Meta कंपनी Instagram वर दीर्घ व्हिडिओ शेअर करण्याच्या सुविधेसह काही नवीन फीचर्सची चाचणी करत आहे. यामध्ये 90 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ, व्हिडिओमधील महत्त्वाचे भाग Reels म्हणून शेअर करण्याची सुविधा आणि संबंधित व्हिडिओंची मालिका तयार करण्याच्या पर्यायांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या बदलांमुळे Instagram वर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव बदलू शकतो.
Instagram च्या नव्या व्हिडिओ फॉरमॅटमध्ये काय असेल?:  इन्स्टाग्राम (Instagram) दीर्घ व्हिडिओंसाठी ‘Features’ नावाचा नवीन फॉरमॅट आणत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सुविधेमुळे क्रिएटर्सना 90 मिनिटांपर्यंतचे लांब आणि आडव्या स्वरूपातील व्हिडिओ अपलोड करता येऊ शकतील. पॉडकास्ट, मुलाखती, कॉमेडी शो आणि चित्रपटांशी संबंधित कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्सना याचा फायदा होऊ शकतो. यामुळे YouTube सारख्या प्लॅटफॉर्मशी Instagram ची स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी Instagram ने IGTV च्या माध्यमातून दीर्घ व्हिडिओंसाठी स्वतंत्र सुविधा दिली होती. मात्र, हा विभाग 2022 मध्ये बंद करण्यात आला. आता पुन्हा दीर्घ व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मोठ्या व्हिडिओमधून Reels तयार करण्याची सुविधा : नव्या फीचरमध्ये ‘Clips as Reels’ या टूलचाही समावेश असल्याचा दावा आहे. या सुविधेद्वारे क्रिएटर्सना त्यांच्या मोठ्या व्हिडिओमधील महत्त्वाचे भाग निवडून छोट्या Reels तयार करता येतील. या क्लिप्स पाहणाऱ्या प्रेक्षकांना मूळ पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा पर्यायही मिळू शकतो. याशिवाय, ‘Series’ या फीचरच्या माध्यमातून संबंधित व्हिडिओ एकाच मालिकेत एकत्र ठेवता येतील. त्यामुळे एखाद्या विषयावरील वेगवेगळे भाग प्रेक्षकांना सलग पाहणे सोपे होईल. तसेच, नवीन लाइव्ह व्हिडिओ शोधण्यासाठी स्वतंत्र डिस्कव्हरी पर्यायाचीही चाचणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
क्रिएटर्सना कमाईची संधी मिळणार? :   दीर्घ व्हिडिओंमुळे भविष्यात जाहिराती आणि ब्रँड पार्टनरशिपच्या माध्यमातून क्रिएटर्सना कमाईच्या अधिक संधी मिळू शकतात. मात्र, 90 मिनिटांच्या व्हिडिओंमध्ये YouTube प्रमाणे जाहिराती दाखवण्याची सुविधा आणि त्यासाठीचे कमाईचे नियम याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. सध्या या फीचर्सची उपलब्धता मर्यादित असल्याचे वृत्त आहे. भारतातील सर्व युजर्सना ही सुविधा कधी मिळेल, याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित माहिती समजू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here