वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी यशस्वी ठरल्या आहेत. या दोन्ही फ्रेंचायझींनी प्रत्येकी दोन जेतेपद मिळवले आहेत. तर युपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजराज जायंट्स या फ्रेंचायझींच्या पदरी निराशा पडली आहे. यूपी वॉरियर्ससाठी 2026 चा हंगाम खूपच वाईट गेला. त्यामुळे फ्रेंचायझीने आपल्या संघातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. श्वेता सेहरावत, किरण नवगिरे आणि डिएन्ड्रा डॉटिन यांसारख्या मोठ्या खेळाडूंना संघाने करारमुक्त केले आहे. आता पर्समध्ये 3 कोटीहून अधिकची रक्कम असून मोठी बोली लावण्याची संधी आहे.