Home एक्सक्ल्युजिव्ह Captain Smit Machhar : विमानातील दहशतवादी हल्ल्याचा सामना करणाऱ्या स्मित मच्छार यांचा UAE कडून सन्मान; ‘फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ पुरस्कार जाहीर

Captain Smit Machhar : विमानातील दहशतवादी हल्ल्याचा सामना करणाऱ्या स्मित मच्छार यांचा UAE कडून सन्मान; ‘फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ पुरस्कार जाहीर

0
Captain Smit Machhar : विमानातील दहशतवादी हल्ल्याचा सामना करणाऱ्या स्मित मच्छार यांचा UAE कडून सन्मान; ‘फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ पुरस्कार जाहीर
विमानातील दहशतवादी हल्ल्याचा सामना करणाऱ्या स्मित मच्छार यांचा UAE कडून सन्मान; ‘ऑर्डर ऑफ झायेद II’ पुरस्कार जाहीर (X Photo)

Captain Smit Machhar : विमानातील गंभीर हल्ल्याच्या प्रसंगी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य दाखवणारे फ्लायदुबईच्या फ्लाइट FZ1073 चे कॅप्टन स्मित मच्छर यांचा संयुक्त अरब अमिरातीने (UAE) विशेष सन्मान केला आहे. UAE चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी कॅप्टन मच्छर आणि त्यांच्या क्रू सदस्यांना ‘फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ हा पुरस्कार प्रदान केला. दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद यांनी मंगळवारी क्रू सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या धैर्याचे आणि जबाबदारीचे कौतुक केले. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा करण्यात आली.

https://www.prahaar.in/2026/10/28/warning-of-unseasonal-rain-in-maharashtra-once-again-possibility-of-stormy-winds-in-several-districts/

नेमकी घटना काय घडली होती?

30 सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात कॉकपिटमध्ये गंभीर घटना घडली. उपलब्ध वृत्तानुसार, सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन मच्छर जखमी झाले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

 

या संकटाच्या वेळी कॅप्टन मच्छर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर प्रवासी आणि कर्तव्यावर नसलेल्या क्रू सदस्यांनी आत प्रवेश करून हल्लेखोराला रोखण्यास मदत केली. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

‘मला वाटले विमानाच्या रचनेत बिघाड झाला’

UAE मधील ‘द नॅशनल’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कॅप्टन मच्छर यांनी त्या भयावह प्रसंगाचा अनुभव सांगितला. सुरुवातीला डोक्यावर बसलेल्या फटक्यांमुळे विमानाच्या रचनेत काहीतरी बिघाड झाल्याचे आपल्याला वाटल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काही क्षणांतच आपल्यावर दुसऱ्या व्यक्तीकडून हल्ला होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हल्ल्यामुळे त्यांची दृष्टी मर्यादित झाली होती. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी सहकाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली. काही वेळाने ते कॉकपिटमध्ये कोसळले, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

विमानाची उंची वेगाने कमी होत असताना इंजिनचा आवाज मंदावत जाणे हा आपल्या आयुष्यातील सर्वांत भीतीदायक अनुभव असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘विमान वाहतुकीवरील प्रेम कमी झालेले नाही’

इतक्या गंभीर प्रसंगाला सामोरे गेल्यानंतरही विमान वाहतुकीबद्दलचे आपले प्रेम कमी झाले नसल्याचे कॅप्टन मच्छर यांनी स्पष्ट केले. त्या परिस्थितीत आपण आपली जबाबदारी पार पाडू शकलो, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

दुबईचे युवराज शेख हमदान यांनी जखमी कॅप्टन मच्छर यांची भेट घेऊन त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. त्यांनी दाखवलेले धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि मानवी जीवनाचे रक्षण करण्याची भूमिका ही UAE च्या मूल्यांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनीही कॅप्टन मच्छर यांना ‘नागरिक शौर्यासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार’ देण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here