Home ब्रेकिंग न्यूज मुंबईकरांनो, पुढचे सात दिवस पाणी उकळून, गाळून प्या !

मुंबईकरांनो, पुढचे सात दिवस पाणी उकळून, गाळून प्या !

0
मुंबईकरांनो, पुढचे सात दिवस पाणी उकळून, गाळून प्या !

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे – पांजरापूर मधील येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. येवई महासंतुलक जलाशय कप्पा क्रमांक २, बुधवार, २८ ऑक्‍टोबर २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ७ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे नम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

मुंबई शहर, पूर्व उपनगरे यांसह मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांत पाणीपुरवठा केला जाणा-या भागांतील नागरिकांनीही योग्‍य ती खबरदारी घ्‍यावी. पाण्याच्या गुणवत्तेबाबत संभाव्य परिणाम लक्षात घेता, पुढील ७ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. खबरदारीच्या या सूचनांचे पालन करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/28/do-not-use-pollution-causing-firecrackers-opt-for-green-firecrackers-instead-municipal-commissioner-ashwini-bhides-appeal/

प्रभावित विभागांचा तपशील

मुंबई शहर विभाग

ए विभाग – नेव्हल डॉकयार्ड आणि बीपीटी परिसर

बी विभाग – संपूर्ण परिसर

ई विभाग – संपूर्ण परिसर

एफ दक्षिण विभाग – संपूर्ण परिसर

एफ उत्तर विभाग – संपूर्ण परिसर

पूर्व उपनगरे

टी विभाग – मुलुंड (पूर्व) व मुलुंड पश्चिम

एस विभाग – भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व)

एन विभाग – विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर

एल विभाग – कुर्ला (पूर्व)

एम पूर्व विभाग – संपूर्ण परिसर

एम पश्चिम विभाग – संपूर्ण परिसर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here