Home ब्रेकिंग न्यूज MP Sunil Tatkare News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, खासदार सुनिल तटकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

MP Sunil Tatkare News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, खासदार सुनिल तटकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

0
MP Sunil Tatkare News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, खासदार सुनिल तटकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, खासदार सुनिल तटकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच राज्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट आलं आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंगळवारी (27 ऑक्टोबर) निधीसह मंजुरी दिली. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी SDRF आणि NDRF च्या निकषापलीकडे जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/27/nashik-kumbhmela-a-season-of-religious-and-cultural-festivities-in-shik-a-grand-cultural-procession-on-october-30th-and-a-religious-flag-hoisting-ceremony-on-october-31st/

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना कार्यकर्त्यांना सांगितले की, राज्यसरकारने दुष्काळाबाबत SDRF आणि NDRF च्या निकषापलीकडे जाऊन या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले आहे. सोबतच, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत सुरुवात म्हणून देऊ केली आहे. पाच हजार रुपये मदत ही अंतिम मदत नाहीये हे लक्षात घ्या, असे सांगतानाच हे महायुतीचे सरकार असून बळीराजाच्या पाठीशी ठाम उभे आहे शिवाय शेतकऱ्यांना मदतीचा हात नक्की देणार आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

https://www.prahaar.in/2026/10/27/nashik-crime-petrol-pump-operators-in-nashik-hit-by-a-cyber-scam-fraudsters-collected-payments-via-qr-codes-siphoned-off-cash-and-caused-bank-accounts-to-be-frozen/

दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली स्पष्ट भूमिका वारंवार मांडली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीनेही मांडली आहे. राज्यसरकार शेतकऱ्यांना ठोस पद्धतीची मदत देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला. मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दमदाटी करून कर्जवसुली करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांची तक्रार तातडीने नोंदवून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत सरकारची भूमिका मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here