Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon : जळगाव हादरले ! लेकीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला, शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू

Jalgaon : जळगाव हादरले ! लेकीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला, शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू

0
Jalgaon : जळगाव हादरले ! लेकीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला, शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुसरी गावाच्या शिवारात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करत असताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरीता अशोक पाटील (वय ४३) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. घरात साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेतात काम करताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि सरीता पाटील हे मजुरांसह सुसरी गावाच्या शिवारातील गट क्रमांक १२८/१ मधील स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतात कांद्याची लागवड करण्यात आली होती. याठिकाणी निंदणी आणि खुरपणीचे काम सुरू असताना विद्युत खांबावरील एक तार तुटून गवतात पडली होती.काम करत असताना या तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श अशोक पाटील यांना झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. पतीला वाचविण्यासाठी सरीता पाटील त्यांच्या जवळ गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/27/nashik-new-conservation-reserves-in-dindori-surgana-and-taharabad-nashik-14-proposals-approved-across-the-state/

रुग्णालयात नेले; मात्र दोघांचाही मृत्यू

घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोघांनाही त्वरित वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

१ नोव्हेंबरला मुलीचा साखरपुडा

अशोक पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. ज्या आई-वडिलांच्या डोळ्यांत मुलीच्या सुखी संसाराची स्वप्ने होती, त्याच घरावर नियतीने घाला घातला. घरातील आनंदाचे रूपांतर क्षणात दुःखात झाले. या दुर्दैवी घटनेने शोककळा पसरली आहे. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणासाठी तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि आई असा परिवार आहे. कुटुंबातील दोन्ही प्रमुख व्यक्तींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची नोंद वरणगाव पोलिसांत करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शेतातील विद्युत तार नेमकी कोणत्या कारणामुळे तुटून खाली पडली, याचा शोध घेतला जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सुसरी गावासह भुसावळ तालुक्यात शोककळा पसरली असून, ऐन साखरपुड्याच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here