Home क्रीडा IND vs NZ 3rd T20: लाईव्ह सामन्यात टळला मोठा अनर्थ! मिचेलच्या फटक्याने जीव जाता जाता राहिला

IND vs NZ 3rd T20: लाईव्ह सामन्यात टळला मोठा अनर्थ! मिचेलच्या फटक्याने जीव जाता जाता राहिला

0
IND vs NZ 3rd T20: लाईव्ह सामन्यात टळला मोठा अनर्थ! मिचेलच्या फटक्याने जीव जाता जाता राहिला
IND vs NZ 3rd T20: लाईव्ह सामन्यात टळला मोठा अनर्थ! मिचेलच्या फटक्याने जीव जाता जाता राहिला (Photo: ANI)

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि न्यूझीलंडला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर मोठं आव्हान ठेवण्यासाठी जोरदार फटकेबाजी केली. पहिल्या षटकापासून आक्रमक बाणा स्वीकारला. कारण या मालिकेत उर्वरित तीन सामन्यात न्यूझीलंडसाठी करो या मरोची स्थिती आहे. असं असताना एक विकेट पडल्यांतर डॅरेल मिचेल मैदानात आला आणि भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. समोर येईल त्या गोलंदाजावर त्याने जोरदार प्रहार करण्यास सुरूवात केली. या दरम्यान त्याने उत्तुंग षटकार मारला. हा षटकार एका व्यक्तीचा जीव घेऊ शकला असता. हा फटका मारल्यानंतर डॅरेल मिचेलच्या ही बाब लक्षात आली होती, त्यामुळे डोळे बंद करून घेतलं. पण सुदैवाने सदर व्यक्ती वाचली असंच म्हणावं लागेल.

डॅरेल मिचेलचा षटकाराने जीव घेतला असता…

वेलिंगटनच्या मैदानात डॅरेल मिचेल आणि फिन एलन आक्रमक फटकेबाजी करत होते. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. या दरम्यान डॅरेल मिचेल खेळलेला एक फटका धडकी भरवणारा होता. मिचेलने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर एक पुल शॉट मारला. हा फटका मारल्यानंतर चेंडू फ्लॅट सीमारेषेच्या दिशेने गेला आणि सीमेवर उभा असलेला स्टीवर्डला चेंडू लागता लागता राहिला. स्टीवर्ड खरं तर या वेळी प्रेक्षकांकडे पाहात होता. त्यामुळे जरसा अंतराने चेंडू डोक्याच्या मागच्या भागाला लागण्यापासून वाचला. जर असं काही झालं असतं तर स्टीवर्ड जागेवरच पडला असता. यात त्याचा जीवही जाऊ शकला असता. त्यामुळेच हा फटका मारल्यानंतर मिचेलने तोंड लपवलं. फटका लागला तर काय होईल याची जाणीव त्याला होती.

https://www.prahaar.in/2026/10/27/ind-vs-nz-3rd-t20-the-toss-goes-in-indias-favour-shreyas-iyer-opting-to-bowl-speaks-about-the-playing-xi/

डॅरेल मिचेलची आक्रमक फटकेबाजी

न्यूझीलंडने 20 षटकात 3 गडी गमवून 198 धावा केल्या. तसेच विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं. या धावसंख्येत डॅरेल मिचेलचं योगदान 89 धावांचं होतं.त्याने 52 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 171.15 चा होता. आता भारतासमोर हे 199 धावा गाठण्याचं आव्हान आहे. आता हे आव्हान भारतीय संघ पेलणार का? आणि मालिका खिशात घालणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here