Home ताज्या घडामोडी “कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली?” नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंना भर पत्रकार परिदेत सवाल

“कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली?” नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंना भर पत्रकार परिदेत सवाल

0
“कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली?” नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंना भर पत्रकार परिदेत सवाल
"कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली?" नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंना सवाल फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: भीमाशंकरच्या जंगलामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. या जंगलतोडीच्या व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर सुद्धा तुफान व्हायरल होत आहे. भीमाशंकरमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असताना सध्या राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. जंगलतोडीमुळे राज्यातील विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच जंगलतोडीच्या मुद्द्यावरून भाजपा प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/26/minister-radhakrishna-vikhe-advises-mahayuti-leaders-to-exercise-restraint-regarding-the-alleged-500-crore-audio-clip/

कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला कायम विरोध करणाऱ्या संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची परंपरा प्रकल्पाला विरोध करण्याचीच आहे. पर्यावरणाच्या नावाखाली वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरे, तुमच्या कर्जतमधील फार्महाऊससाठी नेमकी किती झाडे तोडली होती? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा एकदा महाराष्ट्राला द्यावं, असा प्रहार भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये लवासासारखी सिटी निर्माण करून तिथे धनदांडग्यांना घरे देण्यासाठी किंवा स्वत:चे फार्महाऊस उभारण्यासाठी नाही तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या घरात वीज जावी आणि महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त व्हावा यासाठी कर्जतमध्ये टोरंटला परवानगी दिली आहे. ज्यांचा इतिहास लवासामध्ये जंगलतोड करून, डोंगर तोडून, आदिवासींचा नायनाट करून स्वतःची घरे बांधण्याचा आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करू नये, अशी टीका नवनाथ बन यांनी केली.

https://www.prahaar.in/2026/10/26/kharges-remarks-about-the-prime-minister-are-a-reflection-of-the-congress-partys-rotten-mindset-minister-nitesh-ranes-criticism/

आधी विरोध करायचा आणि मग मात्र एखादा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला की लगेच महाराष्ट्रातले प्रकल्प परराज्यात जातायत म्हणून जाणीवपूर्वक बोंब मारायची, या विरोधकांच्या विसंगतीवर बोट ठेवत विरोधकांवर नवनाथ बन यांनी टीकेचे बाण सोडले. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कोयना धरणावर पहिल्यांदा सह्याद्री पर्वत रांगांमध्ये कोयना प्रकल्प सुरू केला होता. त्यातून आज मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होते आहे. जर त्यावेळी कोयना प्रकल्पाला विरोध झाला असता तर आज कोयना जलविद्युत प्रकल्प उभा राहिला नसता. त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या विजेची गरज आपण भागवू शकतो. त्याच प्रमाणे हा टोरंट प्रकल्प जवळपास 3,000 मेगावॅट वीज निर्माण करेल. या प्रकल्पामुळे वर्षाला 16 लाख टन कोळशाचे ज्वलन झाले असते, ते थांबणार आहे. शिवाय, वातावरणात सुमारे 1 कोटी 15 लाख टन कार्बन डायऑक्साइड विसर्जित होण्यापासून रोखता येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/24/dcm-eknath-shinde-has-appealed-to-all-shiv-sena-mlas-and-ministers-to-refrain-from-trading-accusations-and-instead-focus-on-providing-assistance-to-farmers/

वातावरणात विसर्जित होणारा कार्बन डाय ऑक्साईड हवेतून शोषून घेण्यासाठी सुमारे 22 ते 24 कोटी वृक्ष लागले असते. या प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती हरित उर्जा असणार आहे. हा पर्यावरण पूरक प्रकल्प असतानाही दुर्दैवाने त्याला विरोध केला जात आहे. शरद पवार साहेब केंद्रात सरकारमध्ये असताना लवासामध्ये कशा पद्धतीने वृक्षतोड झाली, लवासाचा प्रकल्प कसा धनदांडग्यांची घरे उभारण्यासाठी केला होता हे सर्वांना ठाऊक आहे. टोरंट कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी त्या कंपनीकडून पक्षनिधीसाठी नेमका किती निधी घेतला याचे उत्तर द्यावे. माझ्या माहितीनुसार गेल्या पाच- सहा वर्षांत त्यांच्या पक्षाला टोरंट कंपनीने कोट्यवधी रुपयांचा निधी दिलेला आहे. पक्षाच्या देणगीस्वरूपात कोट्यवधीचा निधी घ्यायचा आणि पुन्हा प्रकल्पाला विरोध करायचा, याला डबल ढोलकी म्हणतात, असा टोला बन यांनी विरोधकांना मारला.

https://www.prahaar.in/2026/10/24/a-case-should-be-registered-against-sanjay-raut-for-creating-a-fabricated-audio-clip-demand-by-bjp-state-chief-spokesperson-navnath-ban/

पाच- सहा वर्षांपूर्वी मेट्रोचे कारशेड सुरू करायचे होते, तेव्हा हेच आदित्य ठाकरे पर्यावरणवाद्यांच्या हातात हात घालून मेट्रो प्रकल्पाला विरोध करत होते. आज हा मेट्रो प्रकल्प पूर्ण होऊन गोरेगावपासून चर्चगेटपर्यंतचा मेट्रोचा प्रवास अतिशय सुखकर झाल्याचे आपण पहात आहोत. दुर्दैवाने, हीच इकोसिस्टीम आज पुन्हा एकदा कर्जतच्या टोरंट प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मैदानात उतरली आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा काय होणार, हे कोणीही समजून घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रात सर्व परवानग्या घेऊन एखादा प्रकल्प सुरू केला की पर्यावरणवाद्यांचा आसरा घेऊन त्याला विरोध करण्याचे षड्यंत्र सातत्याने सुरू असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here