

पाळीदरम्यान संप्रेरकांमधील (Hormones) बदलांमुळे महिलांना प्रचंड थकवा जाणवतो. कॉफीमधील कॅफिन झटपट ऊर्जा देते. त्यात तूप मिसळलयाने तुपातील ‘हेल्दी फॅट्स’ कॅफिन शोषून घेण्याचा वेग मंद करतात. परिणामी, शरीराला अचानक झटका न बसता दिवसभर संतत आणि टिकून राहणारी ऊर्जा मिळते.

कॉफीमधील कॅफिनमुळे काही प्रमाणात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सुरुवातीला किरकोळ वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच, शुद्ध साजूक तुपामध्ये दाहकशामक (Anti-inflammatory) गुणधर्म असतात, जे शरीरातील अंतर्गत सूज आणि पाळीचे पेटके (Cramps) सुसह्य करण्यास मदत करतात.

रिकाम्या पोटी किंवा पाळीच्या दिवसांत फक्त ब्लॅक कॉफी पियाल्याने पोटात ॲसिडिटी किंवा जळजळ होऊ शकते. तुपामुळे कॉफीची ही आम्लता (Acidity) कमी होते आणि पोटाच्या अंतर्गत अस्तराचे रक्षण होते.

पाळीदरम्यान अनेक महिलांना गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तुपामध्ये ‘ब्युटीरिक ॲसिड’ (Butyric acid) असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पाळीत होणारा पोटाचा फुगवटा (Bloating) कमी करते.

कॅफिन शरीरातील सेरोटोनिनसारखे फिल-गुड हार्मोन्स उत्तेजित करते. तुपातील फॅटी ॲसिडस् या परिणामाची पातळी टिकवून ठेवतात, ज्यामुळे पाळीदरम्यान होणारी चिडचिड आणि मूड स्विंग्स (Mood swings) नियंत्रित राहतात.