Home ब्रेकिंग न्यूज Chandivali Accident : चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; 4 जण जखमी, महिला चालक पोलिसांच्या ताब्यात

Chandivali Accident : चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; 4 जण जखमी, महिला चालक पोलिसांच्या ताब्यात

0
Chandivali Accident : चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; 4 जण जखमी, महिला चालक पोलिसांच्या ताब्यात

Mumbai News: मुंबईतील चांदिवली परिसरातील नहार शक्ती विभागात कारने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर कार चालवणारी महिला आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपघातग्रस्त कारही जप्त करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/24/good-news-for-sion-and-dharavi-residants-sion-bridge-reopening-after-28-months-best-has-restored-the-original-routes-for-14-bus-services/

चार जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती सिंग असे कार चालवणाऱ्या महिलेचे नाव आहे. या कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने हिमांशू परब, अजय भालेराव, संकेत जॉईल आणि निकेत कदम हे चार जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना जवळच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचा आरोप

कार चालवणारी महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, या आरोपाला अधिकृत दुजोरा मिळाल्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अपघाताच्या वेळी महिला मद्यधुंद होती का, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेसह तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच अपघातात सहभागी कारही ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी अपघाताची नेमकी कारणे आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत अधिक माहिती मिळणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here