Home महत्वाची बातमी Winter Fashion Tips: हिवाळ्यात दिसा स्टायलिश! पार्टीसाठी बेस्ट विंटर फॅशन टिप्स

Winter Fashion Tips: हिवाळ्यात दिसा स्टायलिश! पार्टीसाठी बेस्ट विंटर फॅशन टिप्स

0
Winter Fashion Tips: हिवाळ्यात दिसा स्टायलिश! पार्टीसाठी बेस्ट विंटर फॅशन टिप्स

हिवाळ्याच्या दिवसांत एखाद्या पार्टीला जायचे असेल, तर सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे नक्की काय परिधान करावे? केवळ फॅशनेबल दिसण्याच्या नादात हलके कपडे घातले, तर कडाक्याच्या थंडीमुळे पार्टीचा आनंद खराब होतो. दुसरीकडे, खूप जास्त किंवा जाड गरम कपडे घातल्यास हवा तसा आकर्षक लुक मिळत नाही. म्हणूनच, हिवाळ्यातील कोणत्याही समारंभासाठी असे कपडे निवडणे गरजेचे आहे जे तुम्हाला स्टायलिश लुक तर देतीलच, सोबत थंडीपासून तुमचे संरक्षणही करतील. हिवाळ्याच्या मोसमात फॅशन आणि कम्फर्टचा उत्तम मेळ साधण्यासाठी काही आकर्षक पर्याय खालीलप्रमाणे आहेत:

1. वेलवेट ड्रेस: क्लासिक आणि एलिगंट लुक

वेलवेटचा कपडा हिवाळ्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. हा कापड जाड आणि मऊ असल्याने शरीराला उबदार ठेवतो, तसेच यातील नैसर्गिक चमक तुम्हाला पार्टीमध्ये एक रॉयल आणि प्रीमियम लुक देते. रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या पार्टीसाठी गडद किंवा एमराल्ड ग्रीन (हिरवा), नेव्ही ब्लू, गडद लाल (मॅरून) आणि क्लासिक ब्लॅक हे रंग उत्तम दिसतात. या ड्रेससोबत हाय हील्स, नाजूक ईअररिंग्स आणि हातामध्ये एक सुंदर क्लच वापरावा. जर हवेत जास्त गारवा असेल, तर ड्रेसवर मॅचिंग लॉन्ग कोट किंवा एखादी डिझायनर शॉल पांघरू शकता.

https://www.prahaar.in/2026/10/25/important-news-for-vehicle-owners-you-wont-be-able-to-get-petrol-or-diesel-during-diwali-if-you-dont-have-a-valid-puc-pollution-under-control-certificate/

2. ब्लेझर आणि ट्राउझर: मॉडर्न आणि प्रोफेशनल अंदाज

ज्यांना खूप जड किंवा पारंपारिक कपडे घालायला आवडत नाहीत, त्यांच्यासाठी ब्लेझर आणि ट्राउझरचा कॉम्बिनेशन सर्वोत्तम पर्याय आहे. हे कॉम्बिनेशन ऑफिस पार्टी, कॉकटेल नाईट किंवा मित्रांसोबतच्या डिनरसाठी खूपच कम्फर्टेबल आणि ट्रेंडी दिसते. ब्लॅक किंवा डार्क रंगाच्या ट्राउझरसोबत पांढऱ्या, बेज किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लेझर परिधान करू शकता. ब्लेझरच्या आत हलके थर्मल किंवा फुल स्लीव्ह्स टॉप घाला.  या आऊटफिटवर बूट्स किंवा बंद शूज खूप शोभून दिसतात. सोबत बेल्ट आणि मिनिमल ज्वेलरी जोडल्यास तुमचा लुक परिपूर्ण होईल.

3. स्वेटर ड्रेस आणि लॉन्ग कोट: परफेक्ट विंटर व्हाइब

स्वेटर ड्रेस हा सध्याच्या फॅशन ट्रेंडमधील एक लोकप्रिय प्रकार आहे. हा आऊटफिट शरीराला पूर्णपणे उबदार ठेवतो आणि दिसायलाही अतिशय आकर्षक वाटतो. स्वेटर ड्रेससोबत नि-हाय (गुडघ्यापर्यंतचे) लॉन्ग बूट्स अतिशय स्टायलिश दिसतात. त्यावर एक चांगल्या कटिंगचा लॉन्ग कोट घातल्यास थंडी अजिबात वाजत नाही. कोटसाठी ब्राऊन, बेज, राखाडी (ग्रे) किंवा ब्लॅक यांसारखे न्यूट्रल रंग निवडावेत, जे कोणत्याही कपड्यांवर सहज मॅच होतात.

4. जीन्स आणि वॉर्म टॉप: कॅज्युअल, कम्फर्टेबल लुक

जर तुम्हाला ड्रेस किंवा ब्लेझर घालायचे नसेल, तर हाय-वेस्ट जीन्सवर वॉर्म टॉप आणि त्यावर लॉन्ग ओव्हरकोट हा एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. या लुकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा स्कार्फ, मफलर किंवा हँड ग्लोव्ह्ज वापरू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here