Home ब्रेकिंग न्यूज Tiger Shroff: रस्त्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा निर्णय, अभिनेत्याने मुंबईतील आलिशान घरच विकले

Tiger Shroff: रस्त्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा निर्णय, अभिनेत्याने मुंबईतील आलिशान घरच विकले

0
Tiger Shroff: रस्त्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा निर्णय, अभिनेत्याने मुंबईतील आलिशान घरच विकले

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्यावर 18 ऑक्टोबरला जुहू परिसरामध्ये रात्रीच्या वेळी दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. हल्ल्यामध्ये अभिनेता थोडक्यात बचावला. सध्या अभिनेत्याची तब्येत व्यवस्थित आहे. टायगरवर गोळीबाराची घटना झाल्यानंतर अभिनेत्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टायगरने त्याचे जुहूतील अपार्टमेंट विकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याचं जुहूतील अलिशान अपार्टमेंट विकलं आहे. अभिनेत्याच्या घर विकण्याच्या ह्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

https://www.prahaar.in/2026/10/25/cbfc-data-leak-case-documents-related-to-over-500-films-exposed-including-scripts-and-contracts/

मिळालेल्या माहितीनुसार, टायगरचं खार वेस्टमध्ये असलेल्या उच्चभ्रू सोसायटीतील अपार्टमेंट 9 कोटींना विकल्याची माहिती आहे. अभिनेत्याच्या उच्चभ्रू सोसायटीतल्या घराची विक्री 22 ऑक्टोबर 2026 रोजी रजिस्टर झाल्याची माहिती रियल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म CRE Matrix ने दिलेली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, रुस्तोमजी पॅरामाऊंट डी कॉ. ऑप. सोसायटीतील 9व्या मजल्यावर अभिनेत्याचं घर होतं. 1,291.14 चौरस फूट कार्पेट एरिया असलेलं घर टायगरने 9 कोटींना विकले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणामुळे त्याने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.

https://www.prahaar.in/2026/10/25/a-new-beginning-in-ashwini-mahangades-life-wedding-photos-become-a-talking-point/

मिडिया रिपोर्टनुसार, 2018 साली रुस्तोमजी पॅरामाऊंट डी सोसायटीमध्ये असलेलं घर टायगरने हे अपार्टमेंट बिल्डरकडून 7.61 कोटी रूपयांना विकत घेतलं होतं. तब्बल 8 वर्षांनंतर आता अभिनेत्याने तेच त्याचं अपार्टमेंट 9 कोटींना विकल्याची माहिती आहे. खरेदीच्या किमतीच्या तुलनेत टाटगरला विक्रीच्या किंमतीमध्ये सुमारे 1.39 कोटी रूपयांचा नफा झाला आहे. यापूर्वीही टायगरने त्याचे घर विकली आहेत. त्यामध्ये, 2025 मध्ये टायगरने त्याच इमारतीतील दुसरं अपार्टमेंट 15.6 कोटी रूपयांना विकलं होतं. तर 2026 च्या सुरूवातीला पुण्यातील हडपसर परिसरातील मालमत्तेची 8.87 कोटी रूपयांना विक्री केली होती. परंतू अभिनेत्याने त्याचं खार वेस्टमधील घर सुरक्षेच्या कारणास्तव विकल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे. गोळीबाराच्या काही दिवसांनंतर टायगरच्या घराच्या विक्रीची बातमी समोर आल्याने या व्यवहाराकडे लक्ष वेधलं गेलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here