Home क्राईम Crime News : यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; दोन गटांतील वादातून दोन तरुणांचा मृत्यू

Crime News : यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; दोन गटांतील वादातून दोन तरुणांचा मृत्यू

0
Crime News : यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; दोन गटांतील वादातून दोन तरुणांचा मृत्यू
यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; दोन गटांतील वादातून दोन तरुणांचा मृत्यू (Google Photo)

Crime News: यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री दोन तरुणांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर धारदार हत्यारांनी वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/25/heartbreaking-incident-in-beed-3-year-old-girl-startled-by-a-barking-dog-dies-after-hot-milk-spills-on-her/

दोन गटांतील वादातून हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. यावेळी  धारदार हत्यारांनी वार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यात अभय उर्फ मित्तम पाठोडे (मूळ रा. राजुरवाडी, घाटंजी; सध्या रा. उमरसरा) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर श्री चव्हाण हा गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. गंभीर जखमी झालेल्या श्री चव्हाण याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला.

या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा क्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here