Home ब्रेकिंग न्यूज ब्रिटिश साम्राज्याला थेट ललकारणारा ‘फौजी’! प्रभासच्या वाढदिवसावर चाहत्यांना धमाकेदार ट्रीट

ब्रिटिश साम्राज्याला थेट ललकारणारा ‘फौजी’! प्रभासच्या वाढदिवसावर चाहत्यांना धमाकेदार ट्रीट

0
ब्रिटिश साम्राज्याला थेट ललकारणारा ‘फौजी’! प्रभासच्या वाढदिवसावर चाहत्यांना धमाकेदार ट्रीट
प्रभास फौजी चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई: सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘फाइल नंबर 25’ या नावाने समोर आलेल्या या टीझरमध्ये प्रभास एका निर्भीड बंडखोराच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतला असून, यात प्रभास ब्रिटिश सत्तेविरुद्ध तलवार उपसताना पाहत आहे. टीझरची सुरुवात अत्यंत रंजक पद्धतीने होते. यात स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्या ऐतिहासिक भेटीची झलक पाहायला मिळते, जिथे भारताच्या स्वातंत्र्याविषयी चर्चा रंगताना दिसते. या राजकीय पार्श्वभूमीवर प्रभासचा दमदार अ‍ॅक्शन अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे. हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार असलेला प्रभास ब्रिटिश अधिकाऱ्यांना ललकारताना दिसतो. टीझरमधील त्याचा एक डायलॉग विशेष गाजत आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, “अरे ओ फिरंगी, मैं तेरा खून लूंगा और आजादी भी.” हा आक्रमक अंदाज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी पुरेसा आहे.

हनु राघवपुडी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा एक भव्य पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा आहे. 1940 च्या दशकातील काळ आणि ब्रिटिशांविरुद्धचा लढा यात अगदी जिवंतपणे उभा करण्यात आला आहे. चित्रपटाचे स्केल आणि व्हीएफएक्स पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रभासच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर मिळालेली ही भेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरली आहे. ‘फौजी’ व्यतिरिक्त प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी 2’ या चित्रपटाचीही चर्चा सध्या जोर धरत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाचा एक BTS (Behind the Scenes) व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक नाग अश्विन प्रभासला मार्गदर्शन करताना दिसत आहेत. एकीकडे स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक लढा आणि दुसरीकडे भविष्यातील सायन्स फिक्शन, प्रभासचे हे दोन्ही अवतार प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहेत. ‘फौजी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आगामी 19 मार्च 2027 रोजी सिनेमागृहात रिलीज होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रभासचा हा नवा लूक आणि देशभक्तीचा ज्वलंत इतिहास पाहण्यासाठी त्याचे चाहते आतापासूनच उत्सुक झाले आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/24/ayushmann-saras-udta-teer-arrives-at-the-box-office-how-much-did-it-earn-on-its-opening-day/

अंगावर काटा आणणारे संवाद आणि तारीख

“अरे ओ फिरंगी, मैं तेरा खून लूंगा और आजादी भी…” हा प्रभासचा जबरदस्त संवाद आणि त्याचा रुबाबदार लूक अंगावर काटा आणणारा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार यात शंका नाही. हनु राघवपुडी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट 19 मार्च 2027 रोजी सिनेमागृहात झळकण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ‘कल्की 2898 एडी 2’ च्या सेटवरील एक खास व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here