Home एक्सक्ल्युजिव्ह IND vs NZ: डेथ ओव्हर्सचा नवा राजा तिलक वर्मा! सातव्या गड्यासाठी विक्रमी भागीदारीसह रचला इतिहास

IND vs NZ: डेथ ओव्हर्सचा नवा राजा तिलक वर्मा! सातव्या गड्यासाठी विक्रमी भागीदारीसह रचला इतिहास

0
IND vs NZ: डेथ ओव्हर्सचा नवा राजा तिलक वर्मा! सातव्या गड्यासाठी विक्रमी भागीदारीसह रचला इतिहास
IND vs NZ: डेथ ओव्हर्सचा नवा राजा तिलक वर्मा! सातव्या गड्यासाठी विक्रमी भागीदारीसह रचला इतिहास (Photo: ANI)

भारताने न्यूझीलंडविरुद्धचा हा दुसरा टी20 सामना यशस्वीरित्या जिंकून इतिहास रचला असून या विजयात तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी मोलाचे योगदान दिले. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना सातव्या गड्यासाठी झालेल्या सर्वोच्च भागीदारीच्या यादीत आता भारताच्या तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी नाबाद 69 धावांची भागीदारी करत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांनी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चामिका करुणारत्ने आणि दासुन शनाका यांनी केलेल्या नाबाद 69 धावांच्या भागीदारीची बरोबरी केली आहे. या यादीत 2019 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 82 धावांची भागीदारी करणारे बांगलादेशचे अफीफ हुसेन आणि मोसद्देक हुसेन अव्वल स्थानी आहेत. यापूर्वी भारतासाठी असा पराक्रम 2009 मध्ये युसूफ पठाण आणि इरफान पठाण (नाबाद 59 धावा) यांनी केला होता. आता त्यांना आता तिलक आणि नितीश जोडीने मागे टाकले आहे.

तिलक वर्मा ठरला जगातील नंबर 1 फिनिशर

या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरलेल्या तिलक वर्माने 2026 या वर्षात टी20 क्रिकेटमध्ये शेवटच्या 5 षटकांत (16 ते 20 षटके) धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने या डेथ ओव्हर्समध्ये अवघ्या 203 चेंडूंत 231.52 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने तब्बल 470 धावा कुटल्या आहेत. यात 32 चौकार आणि 37 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. या वर्षात डेथ ओव्हर्समध्ये किमान 75 चेंडू खेळणाऱ्या जगातील सर्व 105 फलंदाजांमध्ये तिलक वर्माचा स्ट्राईक रेट (231.52) हा सर्वात अव्वल आणि सर्वोत्तम ठरला आहे. तिलकच्या या अद्भूत फॉर्ममुळे आणि नितीशच्या साथीमुळे भारताने या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/24/ind-vs-nz-india-defeat-new-zealand-in-the-second-t20-match-by-wickets-now-have-three-opportunities-to-clinch-the-series/

तिलक वर्मा काय म्हणाला?

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिलक वर्मा म्हणाला की, ‘मी फक्त शेवटपर्यंत खेळण्याचा विचार करत होतो. सामन्याच्या अगदी आधी कोचसोबत बोलत होतो. आमचा विश्वास होता की जर आम्ही सामना शेवटपर्यंत नेला तर आम्ही जिंकू शकतो, आमच्यात तो आत्मविश्वास होता. मी नमनला म्हणत होतो की आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहावे लागेल, जेव्हा फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत असतील तेव्हा जोर लावावा लागेल. खेळपट्टी थोडी संथ होती, दुर्दैवाने नमन बाद झाला, नाहीतर आम्ही 19 व्या षटकातच सामना संपवला असता.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here