Home क्रीडा IND vs NZ, 2nd T20 : 1432 दिवसानंतर भुवनेश्वर कुमारचं नशिब चमकलं, 12 चेंडूवर मनासारखं घडलं

IND vs NZ, 2nd T20 : 1432 दिवसानंतर भुवनेश्वर कुमारचं नशिब चमकलं, 12 चेंडूवर मनासारखं घडलं

0
IND vs NZ, 2nd T20 : 1432 दिवसानंतर भुवनेश्वर कुमारचं नशिब चमकलं, 12 चेंडूवर मनासारखं घडलं
IND vs NZ, 2nd T20 : 1432 दिवसानंतर भुवनेश्वर कुमारचं नशिब चमकलं, 12 चेंडूवर मनासारखं घडलं (Photo: BCCI)
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार वर्षानंतर भारतीय संघात पदार्पण केलं. पण पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात म्हणजेच 1432 दिवसानंतर त्याने विकेट काढत प्रतीक्षा संपवली. (Photo: BCCI Photo)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याला संघात संधी मिळाली. पण हा सामना पावसामुळे पूर्ण झालाच नाही. त्यामुळे गोलंदाजीची संधीच मिळाली नाही. (Photo: ANI)
न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेत भुवनेश्वर कुमारची निवड झाली. पण पहिल्या सामन्यात हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे दुसऱ्या साामन्यात काय करतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. (Photo: ANI)
दुसऱ्या टी20 सामन्यातील पहिल्या षटकात 8 धावा दिल्या. पण विकेट मिळाली नाही. पण दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट काढली. डॅरिल मिचेलला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. (Photo: ANI)
भुवनेश्वर कुमारला 1432 दिवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट मिळाली आहे. त्याने शेवटची विकेट 22 नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये घेतली होती. (Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here