Home क्रीडा IND vs NZ T20: अभिषेक शर्माचा खेळ 27 धावांवर ओव्हर! पण एक षटकार मारत मोठा विक्रम रचला

IND vs NZ T20: अभिषेक शर्माचा खेळ 27 धावांवर ओव्हर! पण एक षटकार मारत मोठा विक्रम रचला

0
IND vs NZ T20: अभिषेक शर्माचा खेळ 27 धावांवर ओव्हर! पण एक षटकार मारत मोठा विक्रम रचला
IND vs NZ T20: अभिषेक शर्माचा खेळ 27 धावांवर ओव्हर! पण एक षटकार मारत मोठा विक्रम रचला (Photo: ANI)

क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 5 गडी गमवून 180 धावा केल्या. तसेच विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी गती मिळाली नाही. संजू सॅमसनने पहिलंच षटक निर्धाव घालवलं. दुसऱ्या षटकात अभिषेक शर्माला स्ट्राईक मिळाली आणि डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या षटकात जेकब डफीला शेवटच्या दोन चेंडूवर चौकार मारला आणि दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या षटकात अभिषेकला स्ट्राईल मिळाली आणि त्याने या षटकाच्या पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर नाथन स्मिथने त्याच्या झेल पकडला आणि तंबूच्या दिशेने परतला. पण जाता जाता एक विक्रम नावावर करून गेला.

अभिषेक शर्माचा विक्रम

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या 6 षटकांत म्हणजेच पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा एक नवा ऐतिहासिक विक्रम भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने केला आहे. 100 षटकारांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या 7.77 चेंडूंच्या सरासरीने षटकार मारत हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम भारताच्याच रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने पॉवरप्लेमध्ये 17.05 चेंडूंच्या सरासरीने 98 षटकार मारले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी सलामीवीर मार्टिन गप्टिलन (97 षटकार, सरासरी 16.58) आणि चौथ्या क्रमांकावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (94 षटकार, सरासरी 21.03) आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज क्विंटन डी कॉक 87 षटकारांसह (सरासरी 15.80) पाचव्या स्थानावर आहे.

https://www.prahaar.in/2026/10/24/i-will-not-give-my-car-to-vaibhav-sooryavanshi-why-did-rohit-sharma-say-that/

अभिषेक शर्माने इतर सर्व दिग्गज फलंदाजांच्या तुलनेत निम्म्याहून कमी चेंडूंमध्ये षटकार मारण्याचा पराक्रम करत पॉवरप्लेमधील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पण दुसऱ्या टी20 सामन्यात त्याचा आक्रमक बाणा काही दिसला नाही. पहिल्या टी20 सामन्यातही अभिषेक शर्माने 12 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. तेव्हा त्याने 2 चौकार आणि तीन षटकार मारले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here