Home क्रीडा Sabbineni Meghana : भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्तीची घोषणा, क्रीडा जगतात खळबळ

Sabbineni Meghana : भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्तीची घोषणा, क्रीडा जगतात खळबळ

0
Sabbineni Meghana : भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्तीची घोषणा, क्रीडा जगतात खळबळ
सब्बिनेनी मेघनाची क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर (Photo: ANI)

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघातील धडाकेबाज सलामीची फलंदाज सब्बिनेनी मेघनाने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत तिने आपल्या या प्रवासाचा अंत झाल्याचे जाहीर केले. आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेली आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करणारी मेघना 2022 मधील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकली होती. तिने भारतासाठी 3 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

राष्ट्रकुल रौप्यपदकापासून डब्ल्यूपीएल विजेतेपदापर्यंतचा प्रवास

2022 च्या ऐतिहासिक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा मेघना एक अत्यंत महत्त्वाची भाग होती. मात्र, त्यानंतर तिला भारतीय टी-20 संघात आपले स्थान फार काळ टिकवता आले नाही आणि आयसीसीच्या पुढील स्पर्धांमध्येही तिला संधी मिळाली नाही. महिला प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामात गुजरात जायंट्सने तिला आपल्या संघात सामील केले होते. यानंतर 2024 मध्ये ती जेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाचा एक भाग बनली.

https://www.prahaar.in/2026/10/23/amit-mishra-claims-virat-kohli-ignored-calls-team-comeback-assurance/

क्रिकेटसोबतचे नाते कधीही संपणार नाही

निवृत्तीची घोषणा करताना मेघनाने सोशल मीडियावर लिहिले, “पहिल्यांदा हातात बॅट घेऊन मैदानात उतरणे आणि देशाची जर्सी घालणे हे माझे स्वप्न होते. मैदान माझे घर राहिले आहे.” तिने तिचे कुटुंब, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि बीसीसीआय, आंध्र क्रिकेट संघ, तसेच गुजरात जायंट्स आणि आरसीबीचे मनापासून आभार मानले. पुढे बोलताना ती म्हणाली की, खेळाडू म्हणून प्रवास संपत असला तरी क्रिकेटशी आपले नाते कधीही तुटणार नाही आणि पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ती आपले आयुष्य समर्पित करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here