Home नाशिक कुंभमेळा Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण, नाशिक शहरातील तयारी किती?

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण, नाशिक शहरातील तयारी किती?

0
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण, नाशिक शहरातील तयारी किती?
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तयारी किती? फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. हा कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणार आहे. येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राष्ट्रपतींसोबत चर्चा करण्यात आल्याची माहिती नाशिक महानगर पालिकेच्या महापौर हिमगौरी आहिर यांनी माहिती दिली. त्या आज माध्यमांसोबत चर्चा करत असताना त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची माहिती दिली.

https://www.prahaar.in/2026/10/23/why-does-the-nashik-kumbh-mela-take-place-every-12-years-what-is-the-astrological-calculation-behind-this-find-out/

नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे सदस्य, नाशिक महापालिकेचे महापौर, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. शिवाय, कुंभमेळामंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्रीही यावेळी उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती हजर राहणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 च्या दिवशी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाच्या दिवशीचा तब्बल 65 वर्षांनंतर यंदा त्रिखंडी हा अनोखा योग जुळून आला आहे. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर शंखनाद आणि गोदा आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

ध्वजारोहणाच्या दिवशी राष्ट्रपती नाशिकमध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहतील. ध्वजारोहण सोहळ्याला विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रातील आणि क्रिकेट क्षेत्रासह अन्य मान्यवरही ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. येत्या 25 ऑक्टोबर रोजी शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर शंखनाद आणि गोदा आरतीच्या माध्यमातून ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’ करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने देखील नाशिक शहरामध्ये स्थानिक प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/10/23/we-will-make-nashik-the-spiritual-capital-of-india-shekhar-singh/

कुंभमेळा परिसरात मद्य आणि मांसविक्री बंद ठेवता येईल का, याबाबत विचार सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. मांसविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करता येईल का, याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूर आणि धूळ मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी पाण्याची फवारणी करण्याचा विचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here