Home देश Air India Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ करताच घेतला यू-टर्न; 109 प्रवाशांचा जीव मुठीत

Air India Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ करताच घेतला यू-टर्न; 109 प्रवाशांचा जीव मुठीत

0
Air India Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ करताच घेतला यू-टर्न; 109 प्रवाशांचा जीव मुठीत
एअर इंडियाचे आपत्कालीन लँडिंग

हैदराबाद: उड्डाण भरताच विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. हैदराबादहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी झेपावलेल्या एअर इंडियाच्या AI 417 विमानाबाबत ही थरारक घटना घडली आहे. उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच विमानात काहीतरी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत पायलटने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क साधला आणि विमान पुन्हा सुरक्षितपणे हैदराबाद विमानतळावर परत आणले. सुदैवाने, या घटनेत विमानातील सर्व 109 प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

हवेतच बिघाड, क्षणात वाढली प्रवाशांची धडधड

शमशाबाद येथील विमानतळावरून विमान मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, अवघ्या पाच मिनिटांत बिघाड झाल्याने मोठी दुर्घटना टळली. पायलटने दाखवलेली समयसूचकता आणि एटीसीच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. विमान खाली उतरताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

https://www.prahaar.in/2026/10/23/nashik-trimbakeshwar-kumbh-mela-how-far-along-are-the-preparations-in-the-city-for-the-flag-hoisting-ceremony/

प्रवाशांच्या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था

विमान सुरक्षित उतरवल्यानंतर तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी विमानतळावरील तज्ज्ञ कसून तपासणी करत आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एअर इंडियाच्या व्यवस्थापनाकडून त्यांना मुंबईला पाठवण्यासाठी तातडीने पर्यायी विमानाची किंवा प्रवासाची सोय करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here