Home महाराष्ट्र ठाणे Thane Water Cut: ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये 36 तासांसाठी पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका

Thane Water Cut: ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये 36 तासांसाठी पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका

0
Thane Water Cut: ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये 36 तासांसाठी पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये 36 तासांसाठी पाणी पुरवठा बंद फोटो सौजन्य: सोशल मीडिया

ठाणे: एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे आगामी काळात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रश्न गहण होत असताना आता राज्य सरकारच्या पाट बंधारे विभागाने राज्यातील महापालिकांना पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहे. अशातच ठाणे महापालिकेने शहरामध्ये 10 टक्के पाणी कपात केलेली असतानाच आता अशातच 36 तासांसाठी शहरामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरातील काही परिसरामध्ये 36 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे ठाणेकरांनी येत्या दोन दिवस पुरेल इतका पाणीसाठा भरून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/21/thane-water-crisis-el-nino-tmc-ten-month-masterplan/

ठाणे महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये, ठाणे शहरातील अनेक परिसर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरामध्ये गुरूवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते शनिवारी (24 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 36 तासांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ही पाणीकपात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) क्षेत्रामध्ये जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्पामार्फत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या परिसरांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे. ठाणे महापालिकेने पाणी पुरवठा बंदचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांना बंदच्या काळामध्ये पाणी पुरवठा जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नाही तर, पाणी पुरवठा बंद राहिल, त्या काळात जास्तीचा पाणीसाठा भरून ठेवण्याचे निर्देश दिले. सेवा सुरळित झाल्यानंतर एक ते दोन दिवस शहरामध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने राहण्याची शक्यता आहे.

https://www.prahaar.in/2026/10/21/eknath-shinde-police-commemoration-day-tribute-martyrs/

कोणकोणत्या परिसरात पाणी नसेल?

संपूर्ण दिवा शहर, मुंब्रा शहरातील वॉर्ड 26 आणि 31 वगळता संपूर्ण परिसर, कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत येणारा संपूर्ण परिसर, वागळे वॉर्डातील रूपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक 2 आणि नेहरू नगर तर, मानपाडा प्रभागातील कोलशेत खालचा गाव या परिसरामध्ये गुरूवार, 22 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 वाजेपासून शनिवार, 24 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत असे 36 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहिल, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/19/milk-price-reached-100-rupees-per-litre-in-bhiwandi-rising-fodder-costs-have-left-cattle-shed-owners-in-a-difficult-situation/

शटडाऊन संपल्यानंतर, पुढचे एक- दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना शट डाऊनच्या काळामध्ये घरातील पाणीसाठा जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महापालिकेने नागरिकांना असे आवाहन केले की, पाणी पुरवठा खंडित असताना आणि त्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत होण्याच्या काळामध्ये पाण्याचा अनावश्यक वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पाणी पुरवठा पुर्व पदावर येण्यासाठी एक- दोन दिवसाची शक्यता आहे. ही शक्यता असल्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच नागरिकांना पाणी पुरवठा भरून ठेवण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here