मुंबई: अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक मोहीम राबवली आहे. कोकण विभागात 33,286 किलो राजमा व कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत ₹50.05 लाख आहे. यादरम्यान कोकण, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत निकृष्ट दर्जाचा व चुकीच्या लेबलिंगचा मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, नियमभंग व अस्वच्छतेमुळे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील 11 खाद्य आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/21/fda-raids-festive-season-adulterated-food-seizure/
1. कोकण विभाग: 33 हजार किलोहून अधिक राजमा व कडधान्य जप्त
21 ऑक्टोबर 2026 रोजी कोकण विभागात केलेल्या कारवाईदरम्यान, नवी मुंबईतील नेरूळ येथील ‘मे. आरडीसी ऍग्रो व्हेंचर्स प्रा. लि.’ (M/s RDC Agro Ventures Pvt. Ltd.) या आस्थापनेतून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.
- रेड राजमा स्मॉल: 10,998 किलो (अंदाजित किंमत ₹17,69,860)
- राजमा (होल), ‘बुलेट पल्सेस’: 22,288 किलो (अंदाजित किंमत ₹32,34,720)
असा एकूण 33,286 किलो वजनाचा, अंदाजित ₹50,04,580 किमतीचा साठा अन्न सुरक्षा कायद्याच्या विविध कलमांन्वये जप्त करण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/18/fda-conducts-swift-enforcement-actions-in-chhatrapati-sambhajinagar-and-pune-raids-carried-out-at-reliance-storage-and-blinkit-cold-storage-facilities/
2. नाशिक विभाग: खाद्यतेल, तूप आणि फराळाचे पदार्थ जप्त
नाशिक विभागात 21 ऑक्टोबर 2026 रोजी केलेल्या छापेमारीत खालील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली:
- श्री संताजी ट्रेडिंग कंपनी (सिन्नर, नाशिक): 240 किलो रिफाइंड सोयाबीन तेल (अंदाजित किंमत ₹43,200). येथे प्रयोगशाळा व तांत्रिक व्यक्तीचा अभाव तसेच विश्लेषण अहवाल न मिळाल्यामुळे तेलाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त करण्यात आला.
- मे. न्यू हुमा ट्रेडिंग कंपनी (नाशिक): 153.4 किलो बटर व तूप (अंदाजित किंमत ₹1,18,170).
- महिपती एंटरप्रायजेस (सिडको, नाशिक): 90 किलो पिवळी शेव व पापडी (अंदाजित किंमत ₹19,000).
या मोहिमेत एकूण 483.4 किलो अन्नपदार्थ (अंदाजित किंमत ₹1,70,370) जप्त करण्यात आले.
https://www.prahaar.in/2026/10/17/fda-files-fir-against-officials-of-reliance-blinkit-and-zomato-after-it-finds-48-lakh-rs-worth-expired-food-products-in-thane-and-bhiwandi/
3. छत्रपती संभाजीनगर विभाग: गूळ व बडीशेप जप्त
छत्रपती संभाजीनगर येथील ‘मे. औरंगाबाद कोल्ड स्टोरेज एलएलपी, जाधववाडी’ येथे 21 ऑक्टोबर 2026 रोजी धडक कारवाई करण्यात आली.
- खुला गूळ: 3,749 किलो (अंदाजित किंमत ₹2,06,195)
- बडीशेप (Fennel Seeds): 25 किलो (अंदाजित किंमत ₹4,500)
- स्पेशल सौफ – न्यू बिग बॉस ब्रँड: 448 किलो (अंदाजित किंमत ₹80,640)
एकूण 4,222 किलो साठा (अंदाजित किंमत ₹2,91,335) जप्त करण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/17/license-of-the-kitchen-at-fortis-hospital-mulund-suspended-fda-takes-action/
4. अस्वच्छता आणि नियमभंगांमुळे 11 आस्थापनांचे परवाने निलंबित
हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी व कॅन्टीनमध्ये अस्वच्छ किचन, ड्रेनेजची समस्या, गंजलेले रॅक व भांडी, शिळा पाव ताज्या पावात मिसळणे, अपूर्ण तापमान नोंदी, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे आणि मिठाईमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्याने कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
मुंबई (9 आस्थापना)
- M/s SK Bakery (माझगाव)
- M/s Nekzad Restaurant (ग्रँट रोड)
- M/s Foodies Multi Cuisine (वांद्रे पश्चिम)
- M/s Arabian Luqma (जोगेश्वरी पश्चिम)
- M/s Zidz Food and Hospitality / Delhi Zaiak (कुर्ला पश्चिम)
- M/s Lite Bite Foods Pvt. Ltd. (You Mee) (घाटकोपर पश्चिम)
- M/s Bikkgane Biryani LLP (गोवंडी, चेंबूर)
- M/s Jubilant Foodworks Ltd (Dominos Pizza) (भांडुप पश्चिम)
छत्रपती संभाजीनगर विभाग (2 आस्थापना)
- Dominos Pizza (बीड) — अनुसूची 4 मधील तरतुदींनुसार.
-
के. के. बेकर्स (रहमत नगर, परभणी) — तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे कारवाई.