Home क्रीडा IND vs NZ 1st T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार अय्यर प्रथम गोलंदाजी निवडली आणि म्हणाला..

IND vs NZ 1st T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार अय्यर प्रथम गोलंदाजी निवडली आणि म्हणाला..

0
IND vs NZ 1st T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार अय्यर प्रथम गोलंदाजी निवडली आणि म्हणाला..
IND vs NZ 1st T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार अय्यर प्रथम गोलंदाजी निवडली आणि म्हणाला.. (Photo: BCCI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना क्रिस्टचर्च येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्विकारली. कर्णधार श्रेयस अय्यर नाणेफेकीवेळी म्हणाला की, ‘साहजिकच, कमी वेळेत तयारी करायची होती, खेळपट्टी कशी असेल, किती उसळी देईल याचा अंदाज घ्यायचा होता आणि त्या आधारावर आम्ही हा निर्णय घेतला.’संघाने प्रवास कसा केला? या प्रश्नावर श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘मला वाटतं, खूप चांगला प्रवास झाला. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना परिस्थितीशी, हवामानाशी आणि विशेषतः वेळेतील फरकाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. पण कोणतीही तक्रार नाही. आम्ही व्यावसायिक खेळाडू आहोत आणि ड्रेसिंग रूममधील प्रत्येकाला हे माहीत आहे’

वेस्ट इंडिज मालिकेमधून मिळालेले धड्याबाबत श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर, खूप सकारात्मक गोष्टी आहेत, विशेषतः आमच्या फलंदाजीमध्ये. मला वाटतं, जवळपास प्रत्येक दुसऱ्या सामन्यात 230, 250 धावा करणे ही आमच्यासाठी एक जमेची बाजू होती. आणि गोलंदाजीच्या बाबतीतही, लहान मैदानांवर आणि सपाट खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे सोपे नव्हते, पण मुलांनी खूप धैर्य दाखवले आणि त्याच वृत्तीने आणि दृष्टिकोनाने आम्हाला येथे यायचे आहे. आम्ही दोन बदल केले आहेत. त्यामुळे दुबेच्या जागी रेड्डी आणि प्रिन्सच्या जागी मयंक संघात आला आहे.’

https://www.prahaar.in/2026/10/21/ind-vs-nz-1st-t20-live-streaming-where-can-you-watch-the-india-vs-new-zealand-t20-series-get-all-the-details-here/

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, ‘आम्ही गोलंदाजी करणार होतो. खेळपट्टी ताजी दिसतेय. खेळाडू मोठ्या मालिकेसाठी खूप उत्सुक आहेत. भारताविरुद्ध खेळायला मिळणं ही एक छान गोष्ट आहे. आमच्या संघात खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत.’ बेवॉन जेकब्सबद्दल सँटनर म्हणाला की, तो काय करू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे, मधल्या फळीत त्याच्याकडे खूप ताकद आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मयंक यादव

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here