नाशिक: नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. अलीकडेच नवरात्रोत्सव पार पडला. नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनासाठी जात असतात. येत्या रविवारी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी सुद्धा मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. अशातच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीच्या गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वाहन प्रवेशबंदीच्या कालावधीत बदल केला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/22/there-should-be-an-in-depth-sit-investigation-into-the-clip-held-by-manoj-jarange-patil-demands-bjp-state-chief-spokesperson-navnath-ban/
त्याप्रमाणे, नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडून इतर वाहने, ऑटोरिक्षा शिवाय सर्व प्रकारच्या खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांना शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 पासून सकाळी 6 वाजेपासून सोमवारी 26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती नाशिक जिल्ह्याचे अपर जिल्हादंडाधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी दिली आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून भाविक येत असतात. 23 ऑक्टोबरपासून भाविकांच्या गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने आधीपासूनच नियम लागू करायचे ठरवले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/22/diwali-vacation-for-schools-in-maharashtra-to-begin-from-this-date-education-department-issues-circular/
सप्तश्रृंग गडाचा घाट रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्यामुळे वाहतुक कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, या दृष्टीने प्रवेशबंदीच्या कालावधीत सुधारणा करण्याची विनंती स्थानिक परिस्थितीचा विचार करून करण्यात आली होती. अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी मोटार वाहन अधिनियम, 1988 मधील कलम 115 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून यासंदर्भातील आदेशात अंशतः बदल केला आहे. यापूर्वी दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. आधीच्याच नियमामध्ये सुधारणाकरून आता येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून लागू करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/22/major-preparations-underway-in-trimbakeshwar-ahead-of-the-simhastha-kumbh-mela-national-monument-authority-grants-approval-for-road-repairs-in-the-vicinity-of-the-jyotirlinga-temple/
हा निर्बंध परिस्थितीनुसार शिथिल करण्याचा अथवा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 तसेच मोटार वाहन अधिनियम, 1988 मधील प्रचलित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सुधारित वाहतूक निर्बंधांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच प्रवासाचे नियोजन करताना या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजपूत यांनी केले आहे.