Home क्रीडा Ranji Trophy Elite 2026-27: मुंबईची हिमाचल प्रदेशवर सरशी, सरफराज खान ठरला विजयाचा हिरो

Ranji Trophy Elite 2026-27: मुंबईची हिमाचल प्रदेशवर सरशी, सरफराज खान ठरला विजयाचा हिरो

0
Ranji Trophy Elite 2026-27: मुंबईची हिमाचल प्रदेशवर सरशी, सरफराज खान ठरला विजयाचा हिरो
Ranji Trophy Elite 2026-27: मुंबईची हिमाचल प्रदेशवर सरशी, सरफराज खान ठरला विजयाचा हिरो (Photo: ANI)

रणजी ट्रॉफी 2026-27 स्पर्धेचं पर्व सुरू आहे. या स्पर्धेत मुंबई आणि हिमाचल प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबईच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय मुंबईच्या पथ्यावर पडला. कारण या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेश संघाल एक डाव आणि 97 धावांनी पराभूत केलं. हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 39.5 षटकात सर्व गडी गमवून 140 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने मजबूत आघाडी घेतली. मुंबईने 8 गडी गमवून 528 धावा केल्या आणि डाव घोषित केला. मुंबईकडे पहिल्या डावात 388 धावांची आघाडी होती. ही आघाडी मोडून काढणं आणि विजयासाठी मुंबईला धावा देणं काही हिमाचल प्रदेशला जमलं नाही. हिमाचल प्रदेशने दुसऱ्या डावात सर्व गडी गमवून 291 धावांपर्यंत मजल मारली. पण पहिल्या डावात मुंबईने घेतलेली आघाडी काही मोडता आली नाही. त्यामुळे एक डाव आणि 97 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

मुंबईचा डाव

पहिल्या डावात मुंबईची सुरूवात काही खास झाली नाही. दिव्यांश सक्सेना 9 आणि अंगकृष रघुवंशी 20 धावा करून बाद झाले. त्यानंतर मुशीर खान आणि कर्णधार सिद्धेश लाड यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. मुशीर खान 57 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर सरफराज खानचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने सिद्धेश लाडसोबत 68 धावांची भागीदारी केली. सिद्धेश लाड 87 धावांवर असताना बाद झाला. असं असताना सरफराज खानला आकाश आनंद याची साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली. सरफराज खान 154 धावा करून बाद झाला. तर आकाश आनंद 117 धावांवर नाबाद राहिला. तनुष कोटियान 15 आणि तुषार देशपांडे 26 धावा करून बाद झाले.

https://www.prahaar.in/2026/10/21/amit-mishra-is-the-spin-bowling-coach-for-the-delhi-capitals-for-the-2027-ipl-tournament/

सरफराज खान विजयाचा शिल्पकार

मुंबईकडून पहिल्या डावात तुषार देशपांडेने भेदक गोलंदाजी केली. त्याने 13.5 षटकात 46 धावा देत 4 विकेट काढल्या. तर मोहित अवस्थी 1, सिल्व्हेस्टर डिसोजाने 2 आणि तनुष कोटियनने 1 विकेट काढली. दुसऱ्या डावात मोहित अवस्थीने 5, तुषार देशपांडेने 2, शम्स मुलानीने 2 आणि सिल्व्हेस्टर डिसोजाने 1 विकेट काढली. एकंदरीत या सामन्यात सरफराज खानची खेळी महत्त्वाची ठरली. त्यामुळे या विजयाचा हिरो म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here