Home ब्रेकिंग न्यूज Big Boss 20: माही विज लाजली; प्रेमाबद्दल विचारताच म्हणाली ‘सगळ्यांसाठी नाही’

Big Boss 20: माही विज लाजली; प्रेमाबद्दल विचारताच म्हणाली ‘सगळ्यांसाठी नाही’

0
Big Boss 20: माही विज लाजली; प्रेमाबद्दल विचारताच म्हणाली ‘सगळ्यांसाठी नाही’
Social Media

बिग बॉस 20 सध्या खूप गोष्टींमुळे चर्चेत असतो. मग ते तगडी भांडणं आणि वाद, माही विजची ‘बॉसगिरी’, कनिका विरुद्ध यंग डीएसए, पर्सनल लाईफचे खुलासे या सगळ्या मुळे बिगग बॉस 20 चे स्पर्धक खूप ट्रोल होत असतात. बिग बॉस 20च्या घरात अभिनेत्री माही विजचा एक हलकाफुलका क्षण आज पुन्हा चर्चेत आला आहे. सहस्पर्धी काझी तौकीरने तिच्या प्रेमजीवनाबद्दल गंमतीत विचारले असता, माही लाजत म्हणाली की ती ‘सगळ्यांसाठी खुली नाही’. हा संवाद घरातील लाइव्ह फीडमधून बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.(MAHI VIJ)

https://www.prahaar.in/2026/10/21/kyonki-saas-bhi-kabhi-bahu-thi-2-ends-smriti-irani-ekta-kapoor-emotional/

संवादादरम्यान काझीने माहीला थेट विचारले की कोणी तिच्याकडे प्रेमासाठी येऊ शकते का. त्यावर तिने स्पष्टपणे सांगितले, “नाही, सगळे येऊ शकत नाहीत. मी सगळ्यांसाठी खुली नाही.” काझीने पुढे छेडत म्हटले की कदाचित तिने आधीच तीन-चार जण निवडले असतील, किंवा कोणी तिला प्रपोज करू शकते का. माही मात्र फक्त हसत आणि लाजत राहिली; कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबद्दल तिने दुजोरा दिला नाही. त्यावेळी उपस्थित असलेली उदिती सिंगही गंमतीत म्हणाली की माहीचा ‘खास माणूस’ कदाचित हाच शो बाहेरून पाहत असेल.(BIG BOSS 20)

https://www.prahaar.in/2026/10/21/jailer-2-mohanlal-body-double-actor-revealed/

या संवादाला वजन आहे ते माहीच्या वैयक्तिक पार्श्वभूमीमुळे. तिने आणि अभिनेता जय भानुशाली यांनी जानेवारी 2026 मध्ये विभक्त झाल्याची घोषणा केली होती; त्यांचे १४ वर्षांचे लग्न संपुष्टात आले. दोघांना तारा नावाची मुलगी असून, ते खुशी आणि राजवीर या दोन पालक मुलांचेही संगोपन करत आहेत. दरम्यान, जय भानुशाली यांनी अलीकडेच चाहत्यांशी बोलताना सांगितले की माहीच्या अनुपस्थितीत त्याला मुलगी तारासोबत अधिक दर्जेदार वेळ घालवता येत आहे आणि त्याला माहीने हा शो जिंकावा असे वाटते. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर पहिल्याच दिवशी या पर्वाला ‘डिव्होर्सी स्पेशल’ असे संबोधले होते, ज्यामुळे स्पर्धक तिच्यावर नाराज झाले होते ती खूप चर्चेत आली होती. याच दरम्यान ती तिचा भूतकाळातील नात्यासंबंधीत सुद्धा ट्रोल झाली होती.(JAY BHANUSHALI)


            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here