Home ब्रेकिंग न्यूज Orangutan rescue Odisha : ओडिशातून तस्करीत सापडलेली ५ ओरंगउटान पिल्ले लवकरच परतणार मायदेशी!

Orangutan rescue Odisha : ओडिशातून तस्करीत सापडलेली ५ ओरंगउटान पिल्ले लवकरच परतणार मायदेशी!

0
Orangutan rescue Odisha : ओडिशातून तस्करीत सापडलेली ५ ओरंगउटान पिल्ले लवकरच परतणार मायदेशी!
Orangutan rescue Odisha

चेन्नई : इंडोनेशियाच्या (Indonesia) जंगलांतून बेकायदेशीरपणे तस्करी करून भारतात आणलेली पाच गोंडस ओरंगउटानची (Orangutans) पिल्ले आता पुन्हा त्यांच्या मूळ घरी परतण्यास सज्ज झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मुक प्राण्यांच्या सुखरूप पुनर्वसनासाठी चर्चा करण्यासाठी इंडोनेशियातील वन्यजीव तज्ज्ञांचे एक विशेष पथक येत्या २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहे.

भुवनेश्वरच्या नंदनकानन प्राणिसंग्रहालयात उत्तम सांभाळ

सध्या ही सर्व पिल्ले ओडिशाच्या भुवनेश्वर (Bhuvneshwar) येथील नंदनकानन प्राणिसंग्रहालयाच्या देखरेखीखाली आहेत. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार आणि उत्तम खाणपान दिले जात आहे. भारतामधील इंडोनेशियन दूतावासाच्या विशेष पाठपुराव्यामुळेच हे उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात येऊ शकत आहे. याआधी, नोव्हेंबर २०२४ मध्ये भारतात सापडलेला एक सुमात्रा प्रजातीचा लहान ओरंगउटान तब्बल दोन वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर १९ ऑक्टोबर रोजी इंडोनेशियात सुखरूप पोहोचला होता. जकार्तामधील भारतीय दूतावापने याबद्दलची माहिती अधिकृतरीत्या जाहीर केली होती, ज्यानुसार हा ओरंगउटान सोमवारी इंडोनेशियातील मेदान येथील कुआलानामु विमानतळावर उतरला.

https://www.prahaar.in/2026/10/21/water-shortage-drought-action-plan-october-deadline/

बालासोरच्या बागेत आढळली होती पिल्ले; तस्करीचे मोठे जाळे उघडकीस

गेल्या महिन्यात ८ सप्टेंबर रोजी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका सुरुच्या (कॅसुरीना) बागेत गस्त घालणाऱ्या पथकाला ही पिल्ले बेवारस अवस्थेत आढळली होती. यामध्ये ३ नर आणि २ मादी पिल्ले असून त्यांचे वय अवघे सहा महिने ते एक वर्षाच्या दरम्यान आहे. भारतामध्ये विदेशी प्राण्यांचा पाळीव प्राणी (Pet) म्हणून वाढणारा अवैध व्यापार आणि तस्करी किती खोलवर रुजली आहे, याचे हे उत्तम उदाहरण होते. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आता वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB) आणि ओडिशा पोलिसांचे विशेष पथक (STF) कसून तपास करत आहेत.

“प्राण्यांना त्यांच्या मूळ नैसर्गिक वातावरणात पाठवणे गरजेचे”

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना बंगळुरू येथील प्रसिद्ध वन्यजीव कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या त्रिशाला अशोक यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. त्या म्हणतात, “ही छोटी पिले मानवी ग्रीड आणि वन्यजीव तस्करीची शिकार झाली आहेत. त्यांची सुटका झाली म्हणून सर्व काही संपले असे नाही, त्यांना कायमचे प्राणिसंग्रहालयात किंवा पिंजऱ्यात डांबून ठेवणे योग्य ठरणार नाही.” प्राण्यांचे पुनर्वसन करणे थोडे जिकिरीचे आणि कठीण असते, पण म्हणून प्रयत्न सोडता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. इंडोनेशियामध्ये या वन्यप्राण्यांच्या सवयी, वर्तन आणि नैसर्गिक गरजा उत्तम प्रकारे समजून घेणारे तज्ज्ञ आणि विशेष केंद्रे आहेत, जिथे ही पिल्ले पुन्हा मोकळा श्वास घेऊ शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here