Home ब्रेकिंग न्यूज Tiger Shroff firing case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : सर्व ३ आरोपी १८ ते २२ वयोगटातील, मुंबई गुन्हे शाखेची माहिती

Tiger Shroff firing case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : सर्व ३ आरोपी १८ ते २२ वयोगटातील, मुंबई गुन्हे शाखेची माहिती

0
Tiger Shroff firing case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : सर्व ३ आरोपी १८ ते २२ वयोगटातील, मुंबई गुन्हे शाखेची माहिती
Tiger Shroff firing case

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त (DCP) राज तिलक रोशन यांनी १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले की, अभिनेता टायगर श्रॉफच्या घराजवळ किंवा त्याच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणातील तिन्ही आरोपी अल्पवयीन नसून त्यांचे वय १८, १८ आणि २२ वर्षे आहे. यातील दोन आरोपी हरियाणातील सोनिपतचे आहेत, तर तिसरा आरोपी बिहारचा असून पोलीस त्यांच्या जुन्या गुन्हेगारी रेकॉर्डची कसून चौकशी करत आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/19/minister-nitesh-rane-held-a-press-conference-in-mumbai-and-reprimanded-the-opposition/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयित आरोपींपैकी दोघांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे, तर तिसऱ्या आरोपीने नववीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा या गुन्ह्यामध्ये नेमका काय सहभाग होता आणि त्यांच्या मागे कुणाचे हात आहेत, याचा तपास अधिकारी करत आहेत. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान, कोटा पोलिसांनी मोठी कारवाई करत पुणे-जयपूर एक्सप्रेसमधून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. कोटा रेल्वे स्थानकावर सोमवारी ही कारवाई करण्यात आली. कोटाचे पोलीस अधीक्षक (SP) तेजस्विनी गौतम यांनी सांगितल्यानुसार, हे आरोपी जनरल डब्यातून प्रवास करत होते आणि दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती देताच, कोटा पोलिसांची तांत्रिक टीम अवघ्या १५ मिनिटांत अ‍ॅक्शन मोडमध्ये आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रेन येताच पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत शोधमोहीम राबवून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. मुंबई आणि कोटा पोलिसांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.

पोलिसांनी जेव्हा या तरुणांना ताब्यात घेतले, त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही हत्यार किंवा शस्त्र सापडले नाही. मात्र, या गोळीबार प्रकरणातील त्यांची नेमकी भूमिका समजून घेण्यासाठी पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. पोलीस सध्या आरोपींच्या पळून जाण्याच्या संपूर्ण कटाचा माग घेत आहेत. ते दिल्लीहून नेपाळला कसे जाणार होते, याचा तपास सुरू आहे. तसेच, या आरोपींचे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत काही संबंध आहेत का, या मुद्द्यावरही पोलीस कसून पडताळणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here