Home एक्सक्ल्युजिव्ह Dussehra 2026 : ‘सोनं घ्या सोन्यासारखे राहा!’ दसऱ्यानिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा!

Dussehra 2026 : ‘सोनं घ्या सोन्यासारखे राहा!’ दसऱ्यानिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा!

0
Dussehra 2026 : ‘सोनं घ्या सोन्यासारखे राहा!’ दसऱ्यानिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा!
Dussehra 2026

वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला अत्यंत पवित्र सण म्हणजेच विजयादशमी (Dussehraअर्थात दसरा आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शुभदिनी एकमेकांना आपट्याची पाने वाटून ‘सोनं’ देण्याची आणि एकमेकांच्या सुख-समृद्धीची कामना करण्याची आपली जुनी परंपरा आहे. आजच्या या मंगल प्रसंगी आपण फक्त भेटूनच नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवाराला आणि आप्तस्वकीयांना काहीतरी हटके आणि मनाला भावणारे शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस आणखी खास बनवू शकता.

https://www.prahaar.in/2026/10/20/today-is-vijayadashami-when-and-how-should-the-ghat-sacred-pots-offerings-in-the-prayer-room-be-moved-learn-the-proper-rituals-and-traditions/

यंदाच्या दसऱ्याला तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे आहेत

  • वाईटावर नेहमी सत्याचाच विजय होतो, हा संदेश देणारा हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन करो. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपट्याची पाने लुटत नातेसंबंध आणखी घट्ट करूया.
  • “घरोघरी आनंद नांदो, प्रगतीचा मार्ग उजळो… आपट्याची पाने लुटत जुने सारे गैरसमज विसरून जाऊया, एकमेकांना सोन्यासारख्या गोड आठवणी देऊया!” माझ्या सर्व मित्र-परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • नात्यांमध्ये गोडवा आणि मनात आदराची भावना कायम ठेवणारा हा दसरा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात अपार यश घेऊन आहो. हसत राहा, आनंदी राहा आणि सोन्यासारखे जगा! शुभ दसरा!

  • दसऱ्याचा हा पवित्र दिवस तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा अंत करून विजयाचा नवा मार्ग दाखवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणास आणि आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • “शस्त्रांची पूजा आणि सत्याचा विजय… जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. तुमच्या पाठीशी नेहमी यशाची सावली राहो. आपणास आणि आपल्या संपूर्ण कुटुंबास विजयादशमीच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा!”

  • “झाडाची पाने सोन्यासारखी भासतात, जेव्हा ती आपापसात प्रेमाने वाटली जातात. वाईट सवयींचा त्याग करून चांगल्या विचारांचा स्वीकार करूया. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

  • “रावण दहनासोबत तुमच्या मनातील सर्व ताणतणाव, राग आणि द्वेष जाळून टाका; आणि नव्या उमेदीने आयुष्याची नवी सुरुवात करा. दसऱ्याच्या या मंगलदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि अमाप धन-धान्य लाभो, हीच सदिच्छा!”

  • “सुख, शांती आणि समृद्धीचा हा दिवस तुमच्या दारी आनंदाची नवी किरणे घेऊन येवो. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला विजय मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी दसरा!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here