Home नवरात्रौत्सव Dussehra 2026: दसऱ्याला शस्त्र पूजन केव्हा करायचं? शुभ मुहूर्त कोणता? वाचा एका क्लिकवर

Dussehra 2026: दसऱ्याला शस्त्र पूजन केव्हा करायचं? शुभ मुहूर्त कोणता? वाचा एका क्लिकवर

0
Dussehra 2026: दसऱ्याला शस्त्र पूजन केव्हा करायचं? शुभ मुहूर्त कोणता? वाचा एका क्लिकवर
social media

दसऱ्याच्या दिवशी शास्त्रांची पूजा करणे खूप महत्वाचे असते. या दिवशी शस्त्रे स्वच्छ करून, टिळा लावला जातो आणि फुले अर्पण केली जातात. घरीच शस्त्र पूजा कशी करायची हे जाणून घ्या. दसरा किंवा विजयादशमी हा सण मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. हा सण भगवान रामाने रावणाचा आणि देवी दुर्गेने महिषासुराचा वध केलयाचे प्रतीक आहे. शस्त्रे हे आपले संरक्षण, सुरक्षा आणि अन्यायाचा नाश करण्याचे प्रमुख साधन आहेत. याच कारणामुळे विजयादशमीच्या या विशेष प्रसंगी शस्त्रांची पूजा केली जाते. या शुभ दिवशी आपलया घरातल्या शस्त्रांची पूजा केलयाने समृद्धी आणि सुरक्षिततेची भावना येते.(DUSSEHRA 2026)

https://www.prahaar.in/2026/10/19/nitesh-rane-uddhav-thackeray-dasara-melava-allegations/

शस्त्र पूजेसाठी शुभ वेळ

• तारीख: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

• मुहूर्त: दुपारी 01:59 ते दुपारी 02:45 पर्यंत

• कालावधी: 45 मिनिटे

प्राचीनकाळापासून चालत आलेली परंपरा

प्राचीन काळी राजा-महाराज युद्धात विजय मिळावा आणि आपल्या राज्याचं संरक्षण व्हावं, यासाठी युद्धाला जाण्यापूर्वी शस्त्र पूजा करत असत. शस्त्रांना सामर्थ्य आणि विजयाचं प्रतीक मानलं जात असे. आजही दसऱ्याला अनेक लोक शस्त्रपूजा करून या परंपरेचं पालन केले जाते. आधुनिक काळात ही पूजेल खूप मी महत्व होते.

शस्त्रपूजा का केली जाते त्याचा इतिहास

शस्त्रपूजा ही परंपरा, धर्म, न्याय आणि वाईट प्रवृत्तींच्या नाश यांच्याशी जोडलेली आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून विजय मिळवला, तर देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून देवतांना त्याच्या अत्याचारांतून मुक्त केलं. महिषासुराशी झालेल्या युद्धात देवीने विविध शस्त्रांचा वापर करून अधर्माचा नाश केला. त्यामुळे विजयादशमीला शस्त्रपूजा करणं हे सामर्थ्य, धैर्य आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच प्रतीक मानलं जातं. ही परंपरा आपलयाला सत्याच्या मार्गावर अवलंबण्याची आणि संकटांचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणा देते.

https://www.prahaar.in/2026/10/16/feeling-tired-while-fasting-during-navratri-try-this-delicious-rajgira-amaranth-kheer-to-stay-refreshed-throughout-the-day/

शस्त्रपूजा कशी करावी?

दसऱ्याच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी अंघोळ अरुण चांगले कपडे घालावेत. तुमच्या घरातील देवघर किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी एक लाकडी चौरंग ठेवावा आणि त्यावर लाल किंवा पिवळे कापड टाकावे. तुमची घरातील चाकू, कात्री, तलवारी किंवा इतर संरक्षक उपकरणे पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर ठेवा. यानंतर सर्व शस्त्रांना शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी त्यांच्यावर गंगाजल शिंपडावे. आता शस्त्रांवर हळद, कुकूं, अक्षता, ताजी फुले आणि दुर्वा अर्पण करावे. यानंतर, गुळाचा किंवा मिठाईचा प्रसाद देवाला दाखवावा. दिवा व उदबत्ती लावून आरती करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here