Home ब्रेकिंग न्यूज Marathi Movie Updates: ‘ती समोर आली की प्रेमकथा अन् पाठी आली की…’, प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरच्या नव्या सिनेमाची घोषणा

Marathi Movie Updates: ‘ती समोर आली की प्रेमकथा अन् पाठी आली की…’, प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरच्या नव्या सिनेमाची घोषणा

0
Marathi Movie Updates: ‘ती समोर आली की प्रेमकथा अन् पाठी आली की…’, प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरच्या नव्या सिनेमाची घोषणा
social media

लवकरच मराठी चित्रपटसृष्टी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला घेऊन येत आहे. ‘महाराष्ट्राची क्रश’ आणि ‘चंद्रमुखी’ म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर या चित्रपटात झळकणार असे चाहत्यांना वाटतं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘हडळ’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाशी संबंधित पोस्ट अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांनी शेअर केल्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. ‘ती समोर आली की प्रेमकथा, पाठी आली की भयकथा …’ अशा गूढ शब्दांमुळे चित्रपटाच्या कथेबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, चित्रपटाची नेमकी कथा काय या बद्दल प्रेक्षकांबद्दल कुतूहल निर्माण होत आहे.(NEW MOVIE)

https://www.prahaar.in/2026/10/19/do-you-get-film-roles-only-because-of-ajay-devgn-ishita-dutta-finally-breaks-her-silence-says-i/

प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर या चित्रपटातून चाहत्यांचा भेटीला येणार का?

प्राजक्ता माळी हिने जुळून येती रेशीमगाठ या सिरीयलच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर खो -खो, हंपी यांसारखे चित्रपट आणि वेब सिरीज मोठ्या पडद्यावर आपल्या कामाची छाप सोडली. आणि आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून सगळ्या चाहत्यांची मने जिंकत आहे. प्राजक्ता माळी सध्या सोशियल मीडियावर खूप फेमस होताना दिस आहे. मग ते तिच्या लूकमुळे, डान्समुळे, किंवा अभिनयामुळे असो ती कायम चर्चेत असते. म्हणूनच तिला महाराष्ट्र्राची क्रश म्हणून ओळखले जाते.(PRAJAKTA MALI)

अमृता खानविलकरणे नटरंग या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नटरंग मधील तिची भूमिका आणि नृत्यामुळे तिने प्रेक्षकांचा मनावर राज्य केले. त्यानंतर चंद्रमुखी, कट्यार काळजात घुसली, गोलमाल आणि राझी अशा वेगवेगळ्या चित्रपटातून तिने चाहत्यांच्या मनात घर केले. टीव्ही शोजमधून आणि ओटीटी पालफॉर्म वरून वेगेवेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने चंद्रमुखी या चित्रपटामुळे मन तर जिंकलीच पण नावही कमावले. आता तिला सगळे चाहते चंद्रमुखी या नावाने ओळखतात. आता तिने हडळ चित्रपटाचा पोस्टर सोशियल मीडिया शेअर केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सध्या सोशियल मीडिया वर हडळ चित्रपटाचा पोस्टर खूप व्हायरल होत आहे.(AMRUTA KHANVILKAR)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

या चित्रपटाची निर्मिती मयसभा प्रोडक्शन यांनी केले आहे तर परेश मोकाशी यांचाही या चित्रपटात खूप मोलाचा वाटा आहे. या चित्रपटातील भूमिकांबद्दल किंवा चित्रपटाची रिलिज तारीख जरी कळाली नसली तरी या पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चित्रपटाबद्दल थरार वाढला आहे. हा पोस्टर प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरने त्यांचा सोशियल मीडियावर शेअर केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक्साइटमेंट वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here