Home ब्रेकिंग न्यूज टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चव्हाण यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चव्हाण यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

0
टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चव्हाण यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर मुंबईतील जुहू परिसरात अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला असून तो पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, या फायरिंगमध्ये टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि एक व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तीचे नाव उमेश चव्हाण असून त्यांच्या छातीला गोळी लागली. यानंतर त्यांना जुहू येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमेश यांच्या प्रकृतीसंदर्भात आता अधिक माहिती समोर येत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/19/the-accused-in-the-attack-on-tiger-shroff-were-planning-to-flee-to-nepal-police-apprehended-them-in-kota/

उमेश चव्हाण हे सध्या केईएम (KEM) रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना सुरुवातीला जुहू येथील कूपर रुग्णालयात प्रथमोपचार देऊन त्यांची प्रकृती स्थिर करण्यात आली होती. त्यानंतर, पुढील तपासणी आणि विशेष वैद्यकीय उपचारांसाठी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. या दुखापतीचा त्यांच्या हृदयावर किंवा फुफ्फुसांवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, ते जनरल सर्जरी विभागांतर्गत ‘इमर्जन्सी आयसीयू’ मध्ये उपचार घेत आहेत. तसेच, त्यांना कार्डिओव्हस्कुलर अँड थोरासिक सर्जरी (हृदय व वक्ष शल्यचिकित्सा) विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळत आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाकडून मिळाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने, त्यांना शस्त्रक्रियेशिवाय उपचार दिले जात आहेत आणि त्यांच्यावर बारकाईने वैद्यकीय देखरेख ठेवली जात आहे. पुढील तपासण्या आणि तज्ज्ञांचे मूल्यांकन यांमधून मिळणाऱ्या निष्कर्षांनुसार आणि त्यांच्या प्रकृतीत होणाऱ्या सुधारणेनुसार पुढील उपचारांची दिशा ठरवली जाईल, असे देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

रविवारी (१८ ऑक्टोब) संध्याकाळी टायगर श्रॉफ जुहू परिसरातील पुष्पा नर्सिंग पार्क भागात फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळ संपल्यानंतर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तो मैदानाबाहेर आला. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या गाडीभोवती गर्दी केली होती. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी टायगरच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केला. ही घटना काही क्षणांत घडल्याने परिसरात घबराट पसरली. या गोळीबारात टायगरचा चालक आणि एक चाहता जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी तीन आरोपींना राजस्थानातील कोटा येथून ताब्यात घेतले असून यातील १ आरोपी बिहारचा तर २ हरियाणातील असल्याचे समोर आले आहे.a

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here