Home ब्रेकिंग न्यूज Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा

Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा

0
Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा
Kavya Maran

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर (Aniruddha Ravichandran) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) आयपीएल फ्रँचायझीची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) यांच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या विवाहाची पुष्टी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निमंत्रण आणि तारीख जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये काव्या मारान यांचे आई-वडील, सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी जुबली हिल्स येथील निवासस्थानी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांच्या पोस्टनुसार, काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रकर यांचा विवाह सोहळा २१ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे.

यापूर्वी उडालेल्या अफवा आणि लग्नाची तारीख

वृत्तसंस्थांच्या (TOI) अहवालानुसार, अनिरुद्ध आणि काव्या येत्या ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्न करणार आहेत. मात्र, अद्याप अनिरुद्ध किंवा काव्या यांच्याकडून या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या दोघांच्या लग्नाची चर्चा २०२५ मध्ये सुरू झाली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये संगीतकार अनिरुद्धने या अफवा फेटाळून लावत “लग्न ? हाहा… शांत राहा मित्रांनो, कृपया अशा अफवा पसरवणे थांबवा,” असे म्हटले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर दोघे गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते.

https://www.prahaar.in/2026/10/17/gujarat-bharuch-chemical-factory-blast-workers-killed/

नातेवाईकांकडून मिळालेले संकेत

या वर्षी म्हणजेच जून २०२६ मध्ये, अनिरुद्ध यांचे काका आणि अभिनेते वाय. जी. महेंद्र यांनी एका मुलाखतीत या लग्नावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले होते. त्यांनी सांगितले होते की, “तो मुलगा खूप शांत स्वभावाचा आहे. मला आशा आहे की त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय. मी त्याला याबद्दल खूप खूप अभिनंदन देऊ इच्छितो. तो एका मोठ्या विवाहसोहळ्यात प्रवेश करत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार हे अगदी निश्चित आहे, ते दोघे लग्न करत आहेत.”

कोण आहेत अनिरुद्ध आणि काव्या मारान ?

अनिरुद्ध रविचंद्रकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा संगीत दिग्दर्शक आहे. त्याने ‘लियो’, ‘इंडियन २’, ‘वेट्टैयान’, ‘विदा मुयची’ आणि ‘कुली’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना संगीत दिले आहे. दुसरीकडे, काव्या मारन या सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांच्या सुकन्या असून, त्या सन टीव्ही नेटवर्कच्या कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून जबाबदारी सांभाळतात. तसेच, क्रिकेट जगतात त्या आयपीएलमधील ‘सनरायझर्स हैदराबाद’ (SRH) संघाच्या मालक म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here