Home देश गुजरात हादरले! भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

गुजरात हादरले! भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

0
गुजरात हादरले! भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी
गुजरात : भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट (फोटो सौजन्य: ANI)

भरूच (गुजरात) : गुजरातच्या भरूच जिल्ह्यात एका रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वागरा औद्योगिक क्षेत्रातील ‘सेन्झिल फार्मास्युटिकल केमिकल्स’मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या महाविस्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. 15,000 लिटर क्षमतेच्या रासायनिक कंटेनरचा हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा कानठळ्या बसवणारा आवाज तब्बल 15 किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक कुटुंबांनी सुरक्षेसाठी आपली घरे सोडली आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/17/malaika-arora-brings-understated-grace-to-festive-dressing-in-2-65-lakh-tussar-silk-kalamkari-lehenga-depicting-scenes-from-krishnaleela/

स्फोटाची भीषणता आणि रासायनिक गळतीची भीती

प्राथमिक माहितीनुसार, कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतनी प्रचंड होती की, कंपनीच्या इमारतीचे छत उडाले आणि अंतर्गत यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर परिसरात विषारी रासायनिक वायू गळती झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, प्रशासनाकडून वायू गळतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

https://www.prahaar.in/2026/10/17/supreme-court-notice-centre-child-mobile-tech-addiction/

प्रशासकीय मदत आणि उपचार

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्फोटात जखमी झालेल्या 6 कामगारांना तातडीने भरूचच्या एपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृत कामगारांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी भरूच सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मृतांच्या अधिकृत संख्येची पुष्टी करणे अद्याप बाकी असून, या दुर्घटनेमागची नेमकी कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा औद्योगिक अपघातांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here