Home Uncategorized Greater Noida Case: आधीच रचला होता कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचा कट ? ग्रेटर नोएडा प्रकरणातील गुढ वाढलं

Greater Noida Case: आधीच रचला होता कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचा कट ? ग्रेटर नोएडा प्रकरणातील गुढ वाढलं

0
Greater Noida Case: आधीच रचला होता कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचा कट ? ग्रेटर नोएडा प्रकरणातील गुढ वाढलं
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये आज सकाळी मन हेलावून टाकणारी घटना घडलीये. या घटनेमुळे फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर, संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रेटर नोएडातील रबूरपुरा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला श्रीपदम गावामध्ये ही भीषण घटना घडली आहे. गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना घडलीये. आई-वडीलांसह तीन लहान चिमुकल्यांचाही जीव या घटनेमध्ये गेला आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे ग्रेटर नोएडा शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच फॅमिलीच्या मृत्यू मागील गूढ आता उकललं आहे.

https://www.prahaar.in/2026/10/17/5-members-of-the-same-family-die-in-greater-noida-food-poisoning-suspected-after-consuming-noodles/

एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. एकाच वेळी पाच जणांच्या मृत्यूची बातमी ऐकून पोलीस प्रशासनालाही धक्का बसला आहे. मृत्यूची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घरामध्ये गेल्यानंतर संपूर्ण फॅमिली बेडवर मृतावस्थेत आढळून आली होती. हे दृश्य पाहून फक्त गावकऱ्यांच्याच नाही तर, पोलीस प्रशासनाच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. ही संपूर्ण फॅमिली काल (शुक्रवार- 16 ऑक्टोबर) जत्रेमध्ये गेले होते. जत्रेतून घरी परतल्यानंतर रात्री सर्वांनी नुडल्स बनवून खाल्ले. त्यानंतर चहा सुद्धा प्यायला. इथूनच अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ज्याची उत्तरं पोलीस, फॉरेन्सिक टीम, अन्न- औषध प्रशासन शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/17/delhi-mumbai-expressway-mini-bus-accident-in-jaipur-passenger-bus-out-of-control-and-falls-into-gorge-in-kota-many-passengers-killed/

प्राथमिक तपासानुसार, एकाच कुटुंबातील पाचही जणांचा कसा मृत्यू झाला, याचा तपास पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे. अन्नातून विषबाधा झाली आहे का? याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. अद्याप पाचही जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला नाही, तो आल्यानंतर त्यांच्या मृत्युचे खरे कारण समोर येईल. कौटुंबिक वादामुळे फॅमिलीतील पाचही जणांनी खून किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे का? या प्रश्नाची उकल पोलिसांना विचार करण्यास भाग पाडणार आहे. गावकऱ्यांच्या मते, महेश शुक्रवारी आपल्या कुटुंबासोबत जत्रेत गेला होता आणि तेव्हा तो विष खरेदी करण्यासाठी काही वेळासाठी बाहेर पडला होता. गावकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की, महेशने स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या नुडल्समध्ये विष मिसळले होते. ज्यामुळे या पाचही जणांचा मृत्यू झाला. अद्याप, या तथ्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

https://www.prahaar.in/2026/10/17/do-not-merely-become-legal-experts-instead-become-messengers-for-society-chief-justice-surya-kants-appeal-to-young-lawyers/

महेशच्या सासरच्या मंडळींचा असा आरोप आहे की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी महेशच्या आईने अंदाजे 10 बिघे जमीन आपल्या मुलीच्या आणि तिच्या पतीच्या नावावर हस्तांतरित केली होती. यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये वाद सुरू होता. महेशच्या आईने घरदेखील मुलीच्या नावावर केले होते. 10 वर्षांपूर्वी मिळालेल्या नुकसान भरपाईच्या पैशांमध्ये त्यांनी रबूरपुरा गावामध्ये घर बांधले होते. महेशच्या आईने केलेल्या प्रकारामुळे महेश आणि त्याची पत्नी दोघेही चिंतेत होते. त्यांना मुलांच्या भविष्याची आणि त्यांच्या पुढील आयुष्याची चिंता सतावत होती. महेशच्या सासरच्या मंडळींनी, महेशच्या आईवर आणि त्याच्या बहिणीवर या हत्येचा आरोप केला आहे. डीसीपी श्रवण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान नुडल्स खाल्ले होते. महेशच्या एका मुलाची सध्या परीक्षा सुरू आहे, तो परिक्षेला जाण्यासाठी न उठल्यामुळे शेजारच्यांनी चौकशी केली. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर या संपूर्ण घटनेची उकल झाली. पोलीस, रुग्णवाहिका आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांनी खाल्लेल्या अन्नाच्या आधारावर आम्ही पुढील कारवाई करत आहोत आणि सखोल तपासानंतर पुढील पाऊल उचलले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here