Home ब्रेकिंग न्यूज जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून योजनेत समावेश

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून योजनेत समावेश

0
जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून योजनेत समावेश
जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली ‘पीईटी-सीटी स्कॅन’ ही महागडी तपासणी आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तसेच निवडक 13 प्रकारच्या कर्करोगांसाठी पीईटी-सीटीचा स्वतंत्र अथवा नियमित प्राथमिक निदान प्रक्रिया म्हणून समावेश केला आहे. या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांना स्वतःच्या खिशातून महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा भार कमी होणार आहॆ.

https://www.prahaar.in/2026/10/17/will-inefficient-ministers-in-the-shiv-sena-be-dropped-after-the-dussehra-rally-deputy-chief-minister-eknath-shinde-has-sought-their-report-cards/

सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, 63 कर्करोग उपचारांचा पॅकेजमध्ये ‘पीईटी-सीटी स्कॅन’ तपासणीचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून समावेश केला आहॆ. तसेच 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी ‘स्वतंत्र निदान प्रक्रिया’ म्हणून या तपासणीला मान्यता देण्यात आली आहे. महागड्या तपासणी खर्चामुळे अनेकदा रुग्ण ‘पीईटी-सीटी स्कॅन’ तपासणी पुढे ढकलत किंवा तपासणी टाळत असत. परिणामी आजाराचे स्वरूप समजण्यास आणि योग्यवेळी उपचारांचे नियोजन करण्यास विलंब होतो. ही अडचण लक्षात घेऊन ‘पीईटी-सीटी स्कॅन’ तपासणीचा योजनेत समावेश करण्याची मागणी नागरिक व सलंग्न रुग्णालयांकडून होत होती. या मागणीच्या अनुषंगाने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ,योग्य वेळी होतील. तसेच रुग्णांना महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/10/17/license-of-the-kitchen-at-fortis-hospital-mulund-suspended-fda-takes-action/

कर्करोग उपचारांशी संबंधित 63 उपचार पॅकेजमध्ये ‘पीईटी-सीटी स्कॅन’ स्कॅनचा अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 44 उपचार पॅकेजमध्ये ही सुविधा समाविष्ट होती. नव्या निर्णयामुळे अशा अतिरिक्त पॅकेजची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या निदान प्रक्रियेची उपलब्धता अधिक व्यापक होण्यास मदत होईल. याशिवाय, वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्तता निश्चित झालेल्या निवडक 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी ‘पीईटी-सीटी स्कॅन’ स्कॅन स्वतंत्र किंवा नियमित निदान प्रक्रिया म्हणून समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ‘पीईटी-सीटी स्कॅन’ तपासणीसाठी संपूर्ण शरीर 20 हजार 400, मेंदू (Brain) 14 हजार 650, गॅलियम-68 साठी 15 हजार, हृदय 9 हजार 400 हा दर निर्धारित केलेले असून रुग्णालयांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/17/no-room-in-india-for-the-kind-of-chaos-seen-in-bangladesh-abvp-holds-a-massive-signature-campaign-and-demonstration-at-mumbai-university-to-protect-the-constitution-2/

‘पीईटी-सीटी स्कॅन’ तपासणीसाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीची वैद्यकीय आवश्यकता प्रमाणित करणे बंधनकारक आहे. तसेच, संबंधित अंगीकृत रुग्णालयात आवश्यक तांत्रिक सुविधा, उपकरणे, पात्र मनुष्यबळ आणि स्वतःचे ‘पीईटी-सीटी स्कॅन’ केंद्र असणे आवश्यक आहे. तपासणीपूर्वी पूर्वमान्यता घेणे आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सादर करणेही बंधनकारक राहणार आहे. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here